20.6 C
New York
Tuesday, May 28, 2024

Buy now

spot_img

कृषी विभागातील रिक्त पदांच्या भरती मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली

कृषी विभागातील रिक्त पदांच्या भरती मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे धनंजयजी मुंडे यांना निवेदन

कृषी विभागातील रिक्त पदांच्या भरती मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली

परळी : प्रतिनिधी

सन 2021 रोजी कृषी सेवा अभ्यासक्रमात बदल केला आणि तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा म्हणून
एकच पेपर टेक्रिकलच्या एक्झामसाठी घ्यायचा निर्णय एमपीएससी आयोगाने थेतला. त्यानंतर
सप्टेंबर 2022 मध्ये राजपत्रित अधिकारी पदासाठी पूर्व परीक्षा एकच होईल आणि मुख्य परीक्षा
वेगवेगळ्या होतील असा निर्णय धेतला. मुख्य परीक्षा अगोदर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या होत्या त्यात बदल करून त्या वर्णनात्मक करण्याचा निर्णय आयोगाने घेतला, जानेवारी 2023 मध्ये
याविरोधात आांदोलने झाली आणि त्यामध्ये फक्त राज्यसेवा एक्कझामसाठी बहुपर्यायी होईल बाकी
एक्झाम वर्णनात्मक राहतील असा निर्णय आयोगाने घेतला. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये जाहिरात आली पण त्यामध्ये कृषीची एकही जागा न्हवती.
डिसेंबर 2023 मध्ये 2024 साठीची नागरी सेवा जाहिरात प्रसिद्ध झाली पण यावेळी सुद्धा कृषीची
एकही जागा जाहिरातीमध्ये नाही.
यासर्व प्रकारावरती नामदार धनंजय मुंडे साहेबांना सर्व विषयांची जाण असून आपण स्वतः शेतकरी कुटंबातले आहात. आपण शेतकत्यांचे पुत्र आहात. कृषी विभागात एवढ्या जागा रिक्त असताना आणि एका कृषी प्रधान राज्यात जाहिराती मध्ये कृषी विभागातील एकही पद नसणे हे अत्यंत वेदनादायी आहे. साहेब आपल्याकडून सर्व कृषी पदवी धारकांना खूप अपेक्षा आहेत. फॉर्म भरण्याची शेवट्ची तारीख 25 जानेवारी आहे त्याआधी जास्तीत जास्त कृषि विभागातील
वर्ग – अ व वर्ग – ब पदांच्या जागा देऊन सर्व शेतकरी पुत्रांना न्याय द्यावा. आशा आहे की आपण कृषी बांधवांना नक्कीच न्याय द्याल.. अशा आशयाचे निवेदन कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे बीड जिल्हाअध्यक्ष मुंजाभाऊ गुणाजी गडदे यांच्यामार्फत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना देण्यात आले.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या