23.4 C
New York
Wednesday, August 27, 2025

Buy now

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतनाकरिता आमरण उपोषण!

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतनाकरिता आमरण उपोषण!

 

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतनाकरिता आमरण उपोषण!

कर्मचाऱ्यांचा उपोषना चा २ रा दिवस

लेकर-बाळावर उपासमारीची वेळ

दिंगे-दिलाऐंगे चा फंड्डा

सिरसाळा/प्रतिनिधी

गेल्या पंचवीस महिन्यांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत असलेले वेतन मिळावे, या मागणीसाठी ग्रामपंचायतच्या १६ कर्मचाऱ्यांनी मंगळवार दि. २३ सकाळी ११:०० बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. तालुक्यात सिरसाळा ही
ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजले जाते. ग्रामपंचायतच्या एकूण सोळा कर्मचाऱ्यांना गेल्या पंचवीस महिन्यांपासून वेतन दिले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली
आहे. सतत दोन वर्षांपासून थकीत वेतनापोटी ३० लाख रुपये रखडल्याने ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. परंतू यापुर्वी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी दि.१५ जानेवारी २०१९ ला थकीत वेतननासाठी जिल्हा परिषद बीड कार्यालया समोर दोन दिवसाचे उपोषण करण्यात आले होते.यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे चिटनीस नामदेव चव्हाण काॅमरेट उत्तमराव गित्ते, यांनी उपोषण करतांना भेट दिली आहे. ग्रामपंचायतचे कारकून विश्वंभर देशमुख, कान्होबा काळे, बालू घनघाव, अहेमद पठाण, सुभान गवळी, मुरली शिंदे, राहुल घुंबरे, सलमान पठाण, बळीराम पवार,विक्रम काळे, कौशल्या घनघाव, सुनीता किरवले, अर्चना तूपसमुद्रे, नीलाबाई आरगडे, जनाबाई आरसुळे, कांताबाई किरवले आदींचा समावेश आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या