5.4 C
New York
Sunday, December 8, 2024

Buy now

उद्योग मंत्री ना उदय सामंत यांच्या हस्ते शिवसेना शहरप्रमुख वैजनाथ माने यांनी काढलेले दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

उद्योग मंत्री ना उदय सामंत यांच्या हस्ते शिवसेना शहरप्रमुख वैजनाथ माने यांनी काढलेले दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

परळी वैजनाथ/प्रतिनिधी

 

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ना.एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  परळी शिवसेनेचे शहर प्रमुख श्री वैजनाथ माने यांनी काढलेल्या दिनदर्शिकेचा राज्याचे उद्योग मंत्री ना उदय सामंत हे बीड दौर्‍यावर असताना प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर चालत शहरात शिवसेना शहर प्रमुख वैजनाथ माने यांच्यामार्फत अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणजे शिवसेनेच्या वतीने परळी शहर १० हजार दिनदर्शिकेचे वाटप करण्यात येणार आहे. याचे प्रकाशन राज्याचे सन्माननीय उद्योग मंत्री ना उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उद्योगमंत्री ना सामंत यांनी शहर प्रमुख वैजनाथ माने यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आजपर्यंत राबवलेल्या विविध उपक्रमांचे तोंड भरून कौतुकही केले.

कार्यक्रमास  बीड लोक सभा अध्यक्ष डॉ विजय पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल दादा जगताप शिवसेना जिल्हा संघटक योगेश नवले युवा नेते व्यंकटेश शिंदे राजा भैया पांडे वैजनाथ माने शहर सचिव सय्यद निसार अली शहर संघटक सचिन सोनवणे उपशहर प्रमुख बाळासाहेब खोसे युवा सेना नेते संतोष चौधरी सुधर्शन याधव राजेश शिंदे अरुण माने यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या