मनोज जरांगे पाटील यांचे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या आष्टी तालुक्यातील गाव गावात जंगी स्वागत.
देऊळगाव घाट प्रतिनिधी (आदिनाथ ठोंबरे)
मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या, आष्टी तालुक्यातील धनगरवाडी (डोईठाण) येथील सप्ताहाच्या कार्यक्रमाला जात असताना,दौलावडगाव येथे, मराठा युद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांचे ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतिषबाजी करत, फुलांची उधळण करत, जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी सकल मराठा समाज, व मुस्लिम समाजातील अनेक तरुण त्यांचे स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी ‘मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है’, एक मराठा लाख मराठा आदी घोषणाने दौलावडगाव परिसर दणाणून गेला होता. अहमदनगर बीडच्या सीमेवरील दौलावडगाव येथून, डोईठाण पर्यंत जात असताना, तब्बल दोन तास परिसरात जास्त वेळ दिल्याने, नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी माननीय मनोज जरांगे पाटील यांना नक्कीच खूप उशीर झाला असावा.
मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यासाठी दौलावडगाव येथे, देऊळगाव घाट, बादखेल, मुळेवाडी, आनंदवाडी, मराठवाडी, हारेवाडी, आधी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.