परळी प्रतिनिधी/
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर साहेब प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्या उपस्थितीत मराठवाडा अध्यक्ष तथा वंचितचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांचा उमेदवारी अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शन करुन आज दाखल होणार असुन अँड बाळासाहेब आंबेडकर,अशोक हिंगेंना ताकद देण्यासाठी परळी तालुक्यातील हजारो नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन वंचितचे परळी तालुका अध्यक्ष गौतम साळवे यांनी केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अधिक्र्चत उमेदवार अशोक हिंगे यांचा उमेदवारी अर्ज गुरुवार दि २५ एप्रील रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर साहेब प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण प्रदेश प्रवक्ते फारूख अहमद तक्रार निवारण समितीचे प्रमुख प्रा.विष्णु जाधव सर तसेच वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थिती राहणार आहेत.
वाढती महागाई बेरोजगारी आरक्षणासाठी सर्व समाजाला झुलवत ठेवण्याचे काम या सरकारने केले आहे तसेच जिल्ह्यातील लोकांच्या हाताला काम नाही शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळतं नाही शेतकऱ्यांच्या शेतातील मालाला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही इथला शेतकरी कष्टकरी कामगार या सरकारला कंठाळलेला असुन आता नको युती नको मविआ आता फक्त पाहिजे वंचित बहुजन आघाडी असा सुर जिल्ह्यातील मतदारातुन निघताना दिसत आहे
त्यामुळे आता या दोघांनाही बाजुला सारुन वंचित बहुजन आघाडीला मतदारातुन मोठ्या प्रमाणात जनतेचा समर्थन मिळत आहे.याच जोरावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बीड लोकसभा मतदारसंघातून विजयी होणार होणार असल्याचा विश्वास यावेळी वंचितचे परळी तालुका अध्यक्ष गौतम साळवे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पायी रॅलीने दि२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडी परळी तालुका आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेने मोठ्या संख्येने तालुक्यातुन बीड येथे उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी परळी तालुका अध्यक्ष गौतम साळवे यांनी केले आहे.