🔺भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च पदावर पहिल्यांदाच दलित अधिकारी🔺
📡मुंबई : वृत्तसंस्था
🔶रेल्वे मंत्रालयात ‘चेअरमन अँड सीईओ’चं पद सर्वात मोठं असतं.
भारतीय रेल्वेतील मेकॅनिकल इंजिनीअर्स सेवेचे अधिकारी सतीश कुमार यांची रेल्वे बोर्डाच्या नव्या चेअरमन आणि सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते आजपासून (1 सप्टेंबर 2024) पदभार स्वीकारणार आहेत.
एखादा दलित अधिकारी पहिल्यांदाच इतक्या महत्त्वाच्या पदावर नियुक्त झाल्यानंतर त्या गोष्टीची सोशल मीडियावर जोरात चर्चा होते आहे.
सतीश कुमार 1986 बॅचचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग (IRSME) चे अधिकारी आहेत.
याआधी त्यांनी रेल्वेत डीआरएम आणि रेल्वेच्या एनसीआर झोनमध्ये जीएम पदाची जबाबदारी सांभाळली आहे.
सतीश कुमार यावर्षी 5 जानेवारीला रेल्वे बोर्डात ‘मेंबर ट्रॅक्शन अॅंड रोलिंग स्टॉक’ बनले होते.
भारत सरकारच्या पर्सनल अॅड ट्रेनिंग विभागानुसार (डीओपीटी) एसीसी म्हणजे कॅबिनेटच्या नियुक्ती समितीनं सतीश कुमार यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.
सतीश कुमार 31 ऑगस्ट 2025 पर्यंत म्हणजेच एक वर्ष चेअरमन पदावर कार्यरत राहतील.