5 C
New York
Tuesday, December 3, 2024

Buy now

नुकसानग्रस्त पीक विमाधारक शेतक-यांनी वेळीच तक्रारी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

📲नुकसानग्रस्त पीक विमाधारक शेतक-यांनी वेळीच तक्रारी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

बीड : बातमीपत्र

सध्या जिल्हयात सततचा पाऊस सुरू असल्यामुळे नुकसानग्रस्त पीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेळीच तक्रारी कराव्यात, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना खरीप हंगाम २०२४’ मध्ये ‘भारतीय कृषी विमा कंपनी मार्यादित’ यांच्यामार्फत बीड जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी या काळांमध्ये पिकांचे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास,भूस्खलन,गारपीट, ढगफुटी, महापूर, दीर्घ काळ पाणी साचून झालेले नुकसान व चक्रीवादळ, वीज पडून लागलेली नैसर्गिक आग इत्यादी कारणामुळे पिकाचे नुकसान झाले असल्यास. यासह ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंड्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते अश्या कापणी/काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत(१४ दिवस) गारपीट,चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मोसमी पावसामुळे नुकसान झाले असल्यास खरीप हंगाम २०२४ मध्ये पिक विमा भरलेल्या शेतकरी बांधवांनी ७२ तासात पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार करावी.
नुकसानग्रस्त पीक विमाधारक शेतकरी बांधवांनी वेळीच तक्रारी दाखल कराव्यात. पिक विमा कंपनीला तक्रार देण्यासाठी कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत विकसित क्रॉप इन्शुरन्स अप्लिकेशन पुढील लिंक द्वारे गूगल प्ले स्टोर वरून डाऊनलोडकरून घ्यावे. https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central या अप्लिकेशनचा वापर करून त्याद्वारे माहिती द्यावी. अधिक माहितीसाठी तालुका व जिल्हा कृषी कार्यालयातील खालील विमा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन बीड जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, श्री सुभाष साळवे यांनी केले आहे. तसेच जर काही अडचण आल्यास कंपनीचा टोल फ्री क्रमांक १४४४७ असा असा ई-मेल पुढील प्रमाणे आहे. pikvima@aicofindia.com यावरही संपर्क करू शकता, असे ही सांगितले आहे.

तालुका प्रतिनिधी यांचे संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे

बीड तालुक्यात अविनाश सोनावणे (७०२०६२१७४७ ),पाटोदा तालुक्यात गोल्हार संपत
(९७६४५५२२०३), आष्टी तालुक्यात लोंढे विनोद (९१४६८४०१०१), शिरूर कासार तालुक्यात
विघ्ने गणेश (९७६७३५५९६९), माजलगाव तालुक्यात कुशेर आनंद (८३२९१३५७८९),
गेवराई तालुक्यात चिकणे धनंजय (८४८२९१४४४४ ),
धारूर तालुक्यात विशाल गायकवाड
(७७०९८२६९२६ ), वडवणी तालुक्यात सावंत लहू (७३५०५०६३५५), अंबेजोगाई तालुक्यात पोटभरे नंदकुमार, (९४०३१८१४१४), केज तालुक्यात चौरे राहूल (८००७३३००२१),
परळी तालुक्यात डापकर भागवत (९४०४८८६८८३ ), जिल्हा व्यवस्थापक इनकर बाबासाहेब
(९८५०३१००५३ ) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या