7.9 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी- मराठा समाजाचे निवेदन

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी; मराठा समाजाचे निवेदन

 

परळी (प्रतिनिधी):-

बीड जिल्ह्यात अनेक दिवसापासून काही समाजकंटक सोशल मीडियावर चितावणीखोर व जातीवाचक भाष्य करत आहेत. जातीवाचक व चितावणीखोर आक्षेपहार्य पोस्ट व कॉमेंट करणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी दि. 18 जानेवारी 2025 रोजी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांना मराठा समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी निवेदनकर्त्यांना आश्वासन दिले आहे.

बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आदीच्या माध्यमातून सोशल मीडियावर काही लोक जाणीवपूर्वक आक्षेपहार्य पोस्ट टाकत आहेत. सदरील पोस्टमुळे समाजात एकमेका विरुद्ध वितुष्ट निर्माण होत आहे. सामाजिक भावना दुखावल्या जात आहेत.
सोशल मीडिया पोस्ट टाकून काही महाभाग जाणीवपूर्वक सामाजिक भावना दुखावण्याचे काम करीत आहेत. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वंद्व निर्माण होऊ शकतो.

एखादी पोस्ट वैयक्तिक अभिव्यक्ती असली तरी ती एक मोठ्या सामाजिक व सांस्कृतिक संदर्भात घेतली जाते. आणि त्यामुळे अनेक लोकांची भावना दुखावली जाऊ शकते.

अशा परिस्थितीत, लोकांची प्रतिक्रिया, संताप, आणि विरोध होणे सामान्य आहे. त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी बीड जिल्ह्यात जे कोणी सोशल मीडियावर चुकीच्या व दोन समाजात तेढ निर्माण करू शकतात अशा पोस्ट टाकणाऱ्या विरुद्ध तात्काळ कारवाई करावी.

यावेळी परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित घाडगे पाटील, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक गंगाधर काळकुटे, हनुमान मुळीक, ॲड. जीवनराव देशमुख, संजय गोडसे, धंनजय कराळे, ॲड. जाधव, सुनील सोळंके आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

@@@@@@@@@@@@@

*सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करणार- पो.अ नवनीत कॉवत*

बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत कार्यालयीन कामकाज साठी बाहेर गेले असल्या कारणाने त्यांच्या सुचणेप्रमाणे पोलीस उपाधीक्षक गोल्डी यांनी निवेदन स्वीकारले. सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यावर कडक कार्यवाही करावी. माँसाहेब जिजाऊ यांच्या बदल आक्षपार्ह वक्तव्य केलेल्या व्यक्तीवर कडक शासन व्हावे अशी ही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांना दूरध्वनीद्वारे सगळया प्रकारची महिती निवेदनकर्त्यांनी दिली आहे. संबंधित लोकांवर कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन या प्रसंगी पोलीस अधीक्षकांनी दिले आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या