12.1 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

रेड्याची मंतरलेली शिंग वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये पुरली – संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

रेड्याची मंतरलेली शिंग वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये !

मुंबई वृत्तसंस्था

राज्याचे विद्यमान मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांचा ५ डिसेंबर रोजी शपथविधी झाला. पण त्यानंतर जवळपास तीन महिने होऊनदेखील अद्याप मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर राहायला गेले नसल्याचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. या प्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. “मारुती कांबळेचे काय झाले? या प्रश्नासारखा देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत? हा आमचा प्रश्न आहे”, असे संजय राऊत यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान म्हणाले.

नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली, मंत्रिमंडळ विस्तार पार पडला, खातेवाटप झाले, पालकमंत्री आणि मंत्र्‍यांच्या बंगल्याचे वाटपही झाले. पण अद्यापही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षावर मुक्कामाला गेले नाहीत, हाच धागा पकडत संजय राऊतांनी खळबळजनक दावा केलाय. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत आरोप केलाय.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या