-
धार्मिक स्थळांना भेटी देत धार्मिक दौरा परतणार!
जबलपूर ( प्रतिनिधी )
मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांचा सातत्याने विविध क्षेत्रांना भेटी देत प्रयोगशील तेव्हा महत्त्व देणाऱ्या कार्यक्षम लेखनिकांची संघटना म्हणून संबोधले जाणाऱ्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा दौरा प्रयागराज,उज्जेन, आयोध्यासह धार्मिक स्थळांना भेटी देणारा असून १० फेब्रुवारी रोजी आष्टीत परतणार आहे.
आष्टी तालुका पत्रकार संघाचे १२ (एक डझन ) सदस्यांचा नियोजीत प्रयाणराज दौरा आहे. हा दौरा आता नागपुराच्या पुढे जबलपुरला पोहचला असुन सकाळी प्रयागराजला पोहचणार आहे.नंतर आयोध्दा, उज्जैन करुन परतीचा प्रवास १० फेब्रुवारीला आष्टीत पोहचणार असल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी भ्रमणध्वनीवरून दिली.
पत्रकार आष्टी तालुका पत्रकार संघाने यापूर्वी अनेक ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारके, धार्मिक क्षेत्र आदी सह राष्ट्र पुरुषांच्या महत्त्वपूर्ण स्थळांना भेटी देत आपल्या लेखणीच्या कर्तव्यांबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या अनुषंगाने दौरे काढलेले आहेत. या वैविध्यपूर्ण नटलेल्या ऐतिहासिक स्थळ भेटीतून आणि प्रवासातून आपल्या लेखणीला बळ मिळते असे नमूद करत ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्लभाऊ सहस्त्रबुद्धे यांनी या विविधतेतून समता, राष्ट्रीय एकता, बंधुभाव सर्वधर्म समभाव या मूल्यांची रुजवून होते असे सांगितले.दरम्यान, आज मार्गक्रमित झालेल्या या आष्टी तालुका पत्रकार संघाच्या दौऱ्यात ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,उत्तम बोडखे, दत्ताभाऊ काकडे, प्रा.डॉ. विनोद ढोबळे,पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण पोकळे,शरद तळेकर,भीमराव गुरव,गणेश दळवी,रघुनाथ कर्डिले,संतोष सानप,सचिन रानडे,मनोज पोकळे आदी सह पदाधिकारी आणि सदस्य सहभागी आहेत.
आष्टी तालुका पत्रकार संघ सदस्यांचा प्रयाणराज,आयोध्या दौरा!
https://atulyamaharashtra.com/