10 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

आष्टी तालुक्यात ४ हजार ८६९ विद्यार्थी देणार १२ वी परीक्षा

 

कला,विज्ञान,वाणिज्य व एमसीव्हीसी शाखेतील विद्यार्थ्यांचा समावेश,नियोजन पूर्ण

 

 

संतोष सानप | आष्टी

आज मंगळवार दि. ११ फेब्रुवारी पासून सुरू होत असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेस तालुक्यातील कला,विज्ञान, वाणिज्य व एमसीव्हीसी या चार शाखेतील ४ हजार ८६९ विद्यार्थी परिक्षा देणार असल्याची माहिती तालुका शिक्षण विभागाने दिली आहे.
तालुक्यातील १२ परिक्षा केंद्रावर इयत्ता बारावीच्या परिक्षा पार पडणार आहे .परिक्षा कॉपीमुक्त व सुरळीतपणे पार पडण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली असून आवश्यक ती सर्व तयारी पुर्ण झाली आहे.

(चौकट 1)

या केंद्रनिहाय परीक्षार्थी संख्या

१) मोतीलाल कोठारी कॉलेज-२५७
२) श्रीराम जुनियर कॉलेज कडा-४३०
३) आनंदराव धोंडे कॉलेज कडा-३०६
४) जनता हायस्कूल सेकंडरी ज्युनिअर कॉलेज धानोरा-५६८
५) आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज धानोरा-५७६
६) महेश हायर सेकंडरी स्कूल रुईनालकोल-२२०
७) ज्ञानेश्वर हायर सेकंडरी स्कूल देऊळगाव घाट-४३२
८) पंडित जवाहरलाल नेहरू जुनिअर कॉलेज आष्टी-३४४
९) भगवान बाबा ज्युनिअर कॉलेज आष्टी-४७६
१०) निवृत्ती राव धस हायर सेकंडरी स्कूल जामगाव-३९८
११) शाहू महाराज ज्युनिअर कॉलेज डोईठाण-३३०
१२) कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आष्टी-५३२
या बारा केंद्रावर ४८६९ विद्यार्थी परिक्षा देणार आहेत.

(चौकट 2)

१२ बैठे पथक व ६ भरारी पथकांची नियुक्ती

जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार परिक्षा कॉपीमुक्त व सुरळीतपणे पार पडण्यासाठी तालुक्यातील १२ परिक्षा केंद्रावर प्रत्येक विषयासाठी १२ बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.शिवाय सर्वच परिक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून प्रत्येक बैठे पथकांमध्ये ३ कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.तसेच जिल्हाधिकारी,महसुल,गटशिक्षण अधिकारी,माध्यामिक विभाग,पोलिस या विभागाची भरारी पथक आहेत.
-सुधाकर यादव,गटशिक्षण अधिकार

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या