मानवाधिकार आयोगाच्या वनिता ठाकरे यांनी उपस्थितांना केलं संबोधित
तिरोडा :
तालुक्यातील वडेगाव येथील रमाईनगर येथे त्याग मूर्ती रमाई जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी वनिता ठाकरे, सिंधू बावनकर, ज्योती देशमुख, जि. प. सदस्य तुमेश्वरी बघेले, तेजराम चव्हाण, दानवीर नंदेश्वर, युवराज रहांगडाले, मोरेश्वर ठाकरे, केतन रामटेके, मेघा बिसेन, जगदीश बावनथडे, डॉ. अविनाश बघेले, सोनू टेंभेकर, दीपाली टेंभेकर, रामकुमार असाटी, कल्पना दहीकर, रवींद्र भगत उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी त्याग मूर्ती रमाई यांच्या छायाचित्राला मार्ल्यापण करून अभिवादन केले. तसेच त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी पं. स. सभापती तेजराम
चव्हाण यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी निरंजन जनबंधू, अलिप टेंभेकर, प्रज्वल चौधरी, नितीन भास्कर, नलिनी टेंभेकर, प्रफुल्ल शहारे, ओमकार चौधरी, नरेंद्र कोटांगले, कविता रहांगडाले, ए. झेड. नंदेश्वर, केतन रामटेके, सुधाकर मेश्राम, हेमंत शहारे यांनी सहकार्य केले.