आष्टी प्रतिनिधी – येथील हंबर्डे महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा डॉ संतोष वनगुजरे यांची नुकतीच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. प्रा डॉ संतोष वनगुजरे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांनी ७ फेब्रुवारी रोजी निवडीचे पत्र दिले आहे.
दि. २३ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झालेल्या डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये सर्व व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी आष्टी येथील अँड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाचे क्रीडा प्रमुख डॉ.संतोष वनगुजरे यांची क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळावर सदस्य म्हणुन पुढील पाच वर्षासाठी निवड करण्यात आली. कुलगुरू अध्यक्ष असणाऱ्या या समिती मध्ये विद्यापीठ व महाविद्यालयातील क्रीडाविषयक धोरण ठरविणे, खेळाडूसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे या व इतर कामे समितीच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा डॉ संतोष वनगुजरे हे स्वतः खेळाडू असल्याने त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविलेले आहेत. विद्यापीठाचे प्रशिक्षक म्हणून ही त्यांनी नावलौकिक अशी कामगिरी बजावली असून विद्यापीठाचे संपूर्ण देशात नाव लौकिक केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची ही निवड केली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर नाना हंबर्डे, सचिव अतुल मेहेर, डॉ.गणेश पिसाळ, दिलीप वर्धमाने, डॉ.गायकवाड, प्रा. महेश चवरे सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ सोपानराव निंबोरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.गजानन सानप, डॉ.लांब, प्राचार्य डॉ.नवनाथ आघाव, डॉ.सचिन कंदले, डॉ.सुनील पंढरे, डॉ.बापू धोंडे, डॉ.डी.के.कांबळे, डॉ.भागचंद सानप, डॉ.शंकर धांडे, डॉ.राजेश क्षीसागर, महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद खेळाडू यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.