5.5 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

बीड जिल्हा पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष जाहीर प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे

बीड जिल्हा पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष जाहीर
प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे

बीड प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बीड जिल्हा शाखेने जिल्ह्यातील तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.तसेच आष्टी येथील ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी दीपक जाधव यांची तर बीड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी प्रतिक कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सर्व नवनियुक्त तालुकाध्यक्ष यांनी तत्काळ नवीन सभासद नोंदणी करून तालुकास्तरीय उर्वरित कार्यकारिणी जाहीर करावी असेही कळवण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि राज्य समन्वयक संतोष मानूरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष बालाजी तोंडे आणि जिल्हाध्यक्ष शेख रिझवान यांनी जिल्ह्यातील नवीन तालुकाध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली आहे.या मध्ये
बीड -धनंजय गुंदेकर
परळी – बालासाहेब फड
अंबाजोगाई – गोविंद महाराज केंद्रे
केज – दुर्गादास लांब
आष्टी – प्रविण पोकळे
धारूर -परमेश्वर राऊत
पाटोदा -महेश बेदरे
शिरूर -शहेबाज पठाण
माजलगाव -अंगद दराडे
गेवराई- राहुल लोंढे यांचा समावेश आहे.तसेच बीड शहर अध्यक्ष पदी प्रतिक कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व शहर अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी त्यांना प्रभारी करण्यात आले आहे.त्याच प्रमाणे प्रदेश उपाध्यक्ष या रिक्त पदी आष्टी चे ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांची राज्य कार्यकारी समितीच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आली आहे.सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यात आणि शहरात नवीन सभासद नोंदणी करून स्थानिक कार्यकारिणी जाहीर करावी असे जिल्हा संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे.वडवणी तालुका अध्यक्षांची नियुक्ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या