5.8 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

युवा नेते राधेश्याम भैय्या धस यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम

 

कडा । सोपान पगारे
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी राखत व तरुणांना रक्तदानाविषयी माहिती मिळावी हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून युवा नेते तथा जामगावचे सरपंच राधेश्याम भैय्या धस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात १३० रक्तदात्‍यांनी रक्‍तदान केले.या मध्ये मोठ्या प्रमाणात तरूणांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.
आष्टी येथील पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित युवा नेते तथा जामगावचे सरपंच राधेश्याम भैय्या धस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला तरूणांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.रक्तदाते यांना माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास आबा धस, युवा नेते राधेश्याम भैय्या धस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी राधेश्याम भैय्या धस मित्र परिवार व नगर येथील सुरभी रक्त पेढीचे डॉ राजेंद्र पवार व विकास जरे, राहुल जरे,शिवम खिल्लारे, सोनिया शितोळे, वैष्णवी भोईटे, दिपाली वाळके, आदित्य जगताप, भावना म्हेत्रे आदींनी परिश्रम घेतले.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या