30.4 C
New York
Monday, August 11, 2025

Buy now

संत चोखामेळा देवस्थान परळी वैजनाथ येथे महाशिवरात्री उत्सव उत्साहात

संत चोखामेळा देवस्थान परळी वैजनाथ येथे महाशिवरात्री उत्सव उत्साहात
———————————–
ह.भ.प. विष्णू महाराज कराड इंजेगावकर यांचे कीर्तन संपन्न
———————————–
परळी /प्रतिनिधी
दि. २६ व २७ फेब्रुवारी २०२५ रोजी संत चोखामेळा देवस्थान परळी वैजनाथ येथे महाशिवरात्री निमित्त एकादशीच्या दिवशी ह.भ.प. विष्णू महाराज कराड इंजेगावकर यांचे कीर्तन आणि बारस भोजन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. शहरातील निजाम काळापासून अस्तित्वात असलेल्या नेहरू चौक जवळील संत चोखामेळा देवस्थान परळी वैजनाथ ट्रस्टच्या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण झाले आहे. परळी शहरातील संत जगमित्र नागा मंदिर, सोपान काका मंदिर आणि संत चोखामेळा मंदिरासाठी निजामाने जमिनी दिल्या होत्या. यासाठी संत चोखामेळा ट्रस्ट स्थापन करून सदर जमीन ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आली. मात्र, कालांतराने या जमिनीवर चहुबाजूंनी अतिक्रमण झाले आहे.
संत चोखामेळा हे वारकरी संप्रदायातील महान संत होते. पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी भाविक संत चोखामेळा यांचे दर्शन घेतात. संत चोखामेळा यांनी बौद्ध विचारावर समतेची शिकवण दिली आहे. त्यांचे साहित्य परिवर्तनवादी आणि तत्कालीन समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करणारे होते.
या कार्यक्रमाला दिंडी क्रमांक २५ चे मालक-चालक बापू सावंत, सत्यवान व्हावळे, मुक्ताराम गवळी, सनी ताटे, लक्ष्मण उबाळे, मधुकर जोगदंड, राम भिसे, भगवान साकसमुद्रे, बाबासाहेब मुंडे, लक्ष्मण सोनवणे, सुनील कांबळे, सौ. शारदाबाई पंडित, यशवंत सोनवणे, राहुल घोबळे यांच्यासह संत चोखामेळा देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या