📡न्याय व्यवस्थेतील दीपस्तंभ :ॲड.दिलीप (मामा) उजगरे
*न्याय व्यवस्थेतील दीपस्तंभ :ॲड.दिलीप (मामा) उजगरे*
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील स्वाभिमानी समाज घडवून त्यांच्या न्याय-हक्कांसाठी लढण्यासाठीच जीवन समर्पित करणारे विधिज्ञ म्हणजेच आदरणीय ॲड. दिलीप ( मामा)उजगरे.परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितले होते की तन-मन-धन समाजाच्या हितासाठी खर्च करा…! डॉ.बाबासाहेबांचा तोच संदेश आमलात आणून ॲड.दिलीप उजगरे मामा सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. दिन-दलित-दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वत:ला झोकून देवून काम करणारे वकील म्हणून त्यांची ख्याती आहे. ॲड.दिलीप उजगरे यांच्यासारख्या स्वाभिमानी भीम अनुयायांच्या भक्कम साथीमुळेच गोरगरीब लोकांना न्याय मिळत आहे.न्याय व्यवस्था,सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, कृषी, ऐतिहासिक, सांस्कृतिक प्रश्नांची जाण असणारा,
उच्चविद्याविभूषित वकील काय करू शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे ॲड.दिलीप (मामा)उजगरे आहेत.
बुद्ध-शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर-माता रमाई या महामानवांच्या जयंती सोबतच समाजोपयोगी विधायक उपक्रम राबविण्याचा ॲड.उजगरे यांचा मानस आहे. प्रामाणिकपणे काम करणे आणि जिद्द हे आपल्या उत्साहाचे रहस्य असल्याचे सांगतात. काळानुसार बदलले पाहिजे. असे त्यांचे ठाम मत आहे. सोशल मीडियावर ते सक्रिय असतात. सोशल तर मीडियावर त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचा जनसंपर्क खूप दांडगा आहे. सामाजिक व कायदा या दोन्ही क्षेत्रात ॲड.उजगरे मामा यांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून त्यांनी वकिली व्यवसायात पदार्पण केले.आजपर्यंत त्यांनी असंख्य केस लढल्या. त्यासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष करून अफाट मेहनत घेतली. प्रत्येकाला न्याय मिळावा यासाठी त्यांची धडपड सुरू असते. त्यांच्या अनेक केसेस गाजल्या आहेत. विधी क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी आपल्या वकिलीला एक नवा आयाम दिला आहे.सर्वसामान्य माणसाचे हक्काचे वकील अशी त्यांची जनमानसातील प्रतिमा आहे.
शालेय तसेच महाविद्यालयीन जीवना पासून त्यांना दलित पँथर चळवळीचे आकर्षण होते. त्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन अनेक आंदोलने केली. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातील त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. या कट्टर भीमसैनिकाने जेलभरो आंदोलनातही सहभाग घेतला होता.राजकीय ऑफर नाकारून या स्वाभिमानी भीमसैनिकाने आपला लढा उभारला आहे. वाचन,लेखन, वक्तृत्व अभिनय, संगीत व गायनाची आवड असल्याने हे सर्व छंद चांगल्या प्रकारे ते जोपासत आहेत. ह्या मधून त्यांना समाधान मिळते.आम्हा सर्व कलावंतांना नवी ऊर्जा देण्याचं काम ते करत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “मी सांस्कृतिक युद्धावर आहे”.हे युद्ध आपणांस कलावंत म्हणून लढायचे आहे आणि तुमच्या सोबतीला मी आहे असा खंबीर पाठिंबा ते आम्हाला देतात. जगातल्या विविध प्रश्नांची उकल ते करतात. आमची विविध सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक प्रश्नांवर चर्चा सुरू असते. मोठा भाऊ या नात्याने ॲड.दिलीप उजगरे मामा आम्हाला अनमोल मार्गदर्शन करतात. ते आमचे दीपस्तंभ आहेत.
जे अशक्य आहे ते शक्य करण्याचा नेहमीच ते प्रयन्त करतात ” म्हणूनच ते एक सामाजिक योद्धे या नावे ओळखले जातात. ॲड.दिलीप उजगरे यांच्या सारख्या दिलदार , प्रयन्तवादी, वैचारिक , सामाजिक , व्यक्तीमत्वाचा सहवास आणि मार्गदर्शन आम्हाला मिळते. हे आमचे अहोभाग्यच.माणसाच्या मनात जिद्द असेल, काही सकारात्मक ध्येय असेल, तर तो कधीच थकत नाही, कधीच थांबत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ॲड. दिलीप उजगरे मामा.
वकील म्हणून जनसेवा करण्याचे कारण, सांगताना ॲड.उजगरे मामा म्हणतात..”गोरगरिबांच्या वस्तीत आजही गरिबांची मुलं अजाणतेपणे गुन्हेगारीत गोवली जातात. त्यांना माणुसकीच्या नात्याने कायदेशीर सल्ला देणारे कुणीही हक्काचे असे नसते. वस्तीपातळीवरच्या आयाबाया दिवसरात्र राबतात. पण, त्यातल्या कित्येक जणींना घरगुती हिंसेचे बळी व्हावे लागते. या मायभगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी आपण हक्काचा वकील व्हावे,त्यांना मान सन्मान मिळवून द्यावा यासाठीच मी या क्षेत्रात कार्यरत आहे”. ॲड.उजगरे मामा यांच्या सारखा कर्तृत्ववान वकील समाजाला लाभला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणासंदर्भातले, मानवी हक्कासंदर्भातले विचार ते जनमानसात रूजवत असतात. ‘शिका, स्वावलंबी व्हा, आपण सगळे भारतीय आहोत, बाबासाहेबांनी संविधानामध्ये जे हक्क आणि अधिकार आपल्याला दिले आहेत, ते जाणून घ्याच. पण, आपल्यासाठी संविधानामध्ये जी मार्गदर्शक तत्वे आहेत, त्याबाबतही विचार करा,’ अशी मांडणी आपल्या वक्तव्यातून ते सातत्याने करत असतात. वस्तीतील गरजू मुलांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी, त्यांना काही अडीअडचण असेल, तर ती दूर करण्यासाठी ॲड. दिलीप उजगरे सदैव तत्पर असतात.
विधिज्ञ दिलीप उजगरे म्हणतात की,न्यायाचा समानार्थी शब्दच मुळात ‘जयभीम’ आहे,हे इथल्या प्रत्येक नागरिकाने लक्षात घेतले पाहिजे व त्यासाठी कुठलाही पूर्वग्रह मेंदूत न ठेवता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचा प्रत्येक भारतीयाने यथार्थ गौरव केला पाहिजे.सत्याची ताकद, प्रामाणिकपणा, संवेदनशिलता, तत्वांशी असणारी बांधिलकी काय असते व त्याचा प्रभाव किती असतो हे अनुभवायचे असेल तर विधिज्ञ दिलीप उजगरे यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आम्ही कायम त्यांच्या संपर्क-सानिध्यात असतो आणि समृद्ध होतो.!
विधिज्ञ ॲड.दिलीप उजगरे म्हणतात,आपली बाजू सत्य असेल व आपण शेवट पर्यंत खंबीर आणि आपल्या मतावर ठाम राहिल्यास आपला विरोधक कितीही शक्तीशाली असला तरी तुम्हांला न्याय मिळवून देण्याची धमक या देशाच्या संविधानात आहे,म्हणजेच “सिर्फ कानून ही मेरा हाथियार है!” असा त्यांना दृढ आत्मविश्वास आहे.
व्यवस्थेने बहिष्कृत केलेल्या, गावकुसाबाहेर फेकलेल्या इथला मुलनिवासी ‘माणूस’ समूहासाठी आणि इथल्या ‘इंडियातल्या’ लोकांसाठी भारतीय संविधानांनुसार कायदा सारखाच आहे हे,हाच संदेश विधिज्ञ ॲड. दिलीप उजगरे मामा आम्हाला देतात.
व्यवस्थेला भिडणाऱ्या गरीबांच्या मसिहाने अर्थातच सर्वप्रिय सन्मित्र मार्गदर्शक ॲड.दिलीप (मामा) उजगरे यांनी वकील म्हणून अणि सर्वांचा मित्र बनून अमीट असा ठसा उमटवला आहे. तो कायम राहो, त्यांना उत्तम आरोग्य आणि त्यांची मानवतावादी संवेदना लौकिकार्थाने सर्वदूर होवो, हीच सदिच्छा!आदरणीय मामांना जन्मोत्सवाच्या स्वाभिमानी-सम्यक मंगलकामना!💐🎂🎂💐
*प्रा. डॉ. सिद्धार्थ आबाजी तायडे*
(सिने-नाटय लेखक-अभिनेता-दिग्दर्शक-समीक्षक तथा सामाजिक-सांस्कृतिक चळवळीचे संशोधक-अभ्यासक)मो.9822836675