भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाबोधी महाविहारासाठी परळीत भव्य मोर्चा संपन्न
तहसीलदारांमार्फत बिहारच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन
परळी प्रतिनिधी.
वंचीतचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर व भीमराव आंबेडकर यांच्या आवाहानानुसार भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर आज दिनांक 12 मार्च रोजी आंदोलन करण्यात आले . त्यानुसार परळी शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला.व तहसीलदार यांच्या मार्फत बिहारच्या मुख्यमंत्र्यांना बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणीचे निवेदन देण्यात आले.
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे, तसेच बीटी अक्ट 1949 रद्द करावा आणि महाबोधी महाविहार ट्रस्टवर हिंदू धर्मातील ट्रस्टींना काढून टाकावे आदी मागण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बुद्ध गया येथे देश विदेशातील बौद्ध भिक्खू व बौद्ध अनुयायांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज दिनांक 12 मार्च रोजी महाराष्ट्रात एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. परळी शहरात भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रेल्वे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात करण्यात आली.
पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झालेले महिला, पुरुष यांच्या हातामध्ये महाबोधी महाविहार मुक्त करा, बी .टी.अॅक्ट 1949 रद्द करा, महाबोधी महाविरातून ब्राह्मण ट्रस्टीची हकालपट्टी करा अशा प्रकारचे फलक दिसत होते .हा मोर्चा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात आल्यानंतर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले .तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना अभिवादन करून मोर्चा परळी तहसील कार्यालयावर येऊन धडकला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच लवकरात लवकर महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या तावडीतून मुक्त नाही झाले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरकारला देण्यात आला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी स्वीकारले व आपले निवेदन राज्य सरकार तसेच बिहार सरकारला पाठवू असे आश्वासन दिले.
या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष हनुमंत वाघमारे, शहराध्यक्ष प्रजावतीताई कांबळे, वंचितचे तालुका अध्यक्ष गौतम साळवे, वंचित चे प्रसिद्ध प्रमुख बालासाहेब जगतकर, तालुका युवक अध्यक्ष राजेश सरवदे, डॉ.स्वप्निल महाळंगीकर ,यशपाल बचाटे, योगेश मुंडे, सिद्धोधन आचार्य, धम्मानंद क्षीरसागर , ज्ञानेश्वर गीते,अनिताताई रोडे ,सुनीताताई किवंडे, सीमाताई कांबळे, रंजनाताई मस्के, रमाताई उबाळे, वाघमारे ताई, सत्यभामाताई बचाटे, रुक्मिणी ताई जोंधळे, शोभाताई गोदाम, प्रभावती डोंबे, आदोडे ताई, तर बौद्धजन संघर्ष समितीच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भास्कर नाना रोडे, प्राध्यापक दासू वाघमारे, सुभाष वाघमारे,प्राध्यापक विलास रोडे, मुक्ताराम गवळी तसेच पत्रकार रानबा गायकवाड, पत्रकार भगवान साकसमुद्रे, मातंग समाजाच्या वतीने जितेंद्र मस्के तर सामाजिक कार्यकर्ते मनोज संकाये आदींनी पाठिंबा दिला.
या मोर्चात परळी शहरातील भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दल यांच्यासह भिमवाडी, मिलिंद नगर, पंचशील नगर ,सिद्धार्थनगर, भीमनगर ,अशोक नगर ,भीमा नगर,नागसेन नगर आदी वस्त्यांमधून बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.