20.3 C
New York
Sunday, August 10, 2025

Buy now

◾जिजाऊंच्या वास्तवाने पावन झालेल्या भूमीमध्ये परळीच्या पत्रकाराचा सन्मान

◾जिजाऊंच्या वास्तवाने पावन झालेल्या भूमीमध्ये परळीच्या पत्रकाराचा सन्मान

◾ज्येष्ठ पत्रकार धनंजय आरबुने यांना वास्तववादी लिखाणासाठी पुरस्कार प्रदान

परळी/प्रतिनिधी –

सिंदखेड राजा हे परगणा लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यासाठी प्रसिद्ध आहे. हा राजवाडा सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात जिजाबाईंचे वडील लखुजी जाधव यांनी बांधला होता . जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी याच ठिकाणी झाला.
ख्यातनाम बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीतील राजे लखुजी जाधव साहित्य नगरी, येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात परळी येथील ज्येष्ठ पत्रकार धनंजय आरबुने यांना त्यांच्या वास्तववादी व सामाजिक लिखाणा बद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला,
राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळावर प्रांत तथा जिल्ह्यातून आवर्जून उपस्थित झालेल्या साहित्यिक, कवी,आणि लेखक व रसिक माता भगिनींना सर्व मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
या साहित्य संमेलनात आपल्या वैविध्यपूर्ण लेखनाने वास्तववादी विषय मांडून सामाजिक जागृती करणारे परळी येथील जेष्ठ पत्रकार धनंजय आरबुने यांना त्यांच्या लिखाणाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून विविध साहित्यिक, लेखक, पत्रकार यांनी त्यांना फोन करून तसेच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या