फड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा नवा टप्पा
◾३ मे २०२५ रोजी अत्याधुनिक आरोग्यसेवेसाठी नवे वास्तूप्रवेश
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
परळी वैजनाथ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या वैद्यकीय सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या रुग्णालयाचा वास्तुशांती आणि गृहप्रवेश सोहळा शनिवार, दि. ३ मे २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
फड कुटुंबीयांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या या नवीन दवाखान्याचे वास्तुशांती पूजन व गृहप्रवेश वैशाख शुद्ध ६, शके १९४७ या शुभमुहूर्तावर होणार असून, त्यानिमित्ताने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १.०० वाजल्यापासून आपल्या आगमनापर्यंत स्नेहभोजन सुरू राहणार आहे.
शहरात आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प फड कुटुंबीयांनी केला असून, रुग्णांसाठी अद्ययावत सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेले हे नवीन हॉस्पिटल परळीसह परिसरातील नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे.
या प्रसंगी सौ. शारदा व श्री. गंगाधर ज्ञानोबा फड, सौ. शोभा व श्री. मधुकर फड, सौ. डॉ. साधना (MD) व डॉ. लक्ष्मण फड (MBBS, MD), सौ. डॉ. शुभांगी (MBBS, DA) व डॉ. पांडुरंग फड (MBBS, DNB Ortho), सौ. डॉ. जयश्री (BAMS) व डॉ. सिद्धेश्वर फड (BDS, MDS – मुंबई) यांच्या उपस्थितीत हा शुभकार्य सोहळा पार पडणार आहे.
वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून समाजाप्रती एक जबाबदारी समजून फड कुटुंबीयांनी गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात सेवा दिली आहे. नव्या दवाखान्याच्या माध्यमातून अधिक व्यापक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा आमचा मानस आहे असेही त्यांनी सांगितले.