➡️ वाट पाहून थकलो, आता संघर्ष हाच पर्याय!
📢 स्वामी विवेकानंद नगरचा पाणीप्रश्न उफाळला; उद्या हंडा मोर्चा
नाशिक –
स्वामी विवेकानंद नगर परिसरातील दीर्घकालीन पाणीटंचाईचा प्रश्न आता उफाळून आला असून, संतप्त महिलांनी हंडा मोर्चा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. बुद्ध पौर्णिमेची शासकीय सुट्टी असल्याने हा मोर्चा मंगळवार, १३ मे रोजी सकाळी १० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयावर नेण्यात येणार आहे.
या मोर्चासाठी परिसरातील सर्व महिलांनी सकाळी ९ वाजता गणपती मंदिर, स्वामी विवेकानंद नगर येथे जमावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या बाळासाहेब घुगे, यमुनाताई घुगे, गौरवी ठाकरे, रेखा पवार, इंदुबाई सानप, शेवाळे ताई, आरती खैरनार यांनी केले आहे.
या आंदोलनाला राजकीय व सामाजिक स्तरावरही मोठा पाठिंबा मिळत असून, आमदार सौ. सीमा हिरे, मंडल अध्यक्ष राहुलभाऊ गणोरे, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस नगरसेविका छाया ताई देवांग, रवी पाटील, राजेंद्र जडे, सागर कडभाणे, उत्तम काळे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा अर्चना ताई दिडोरकर, विठाताई पगारे, जानवी ताई बिरारी हे मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
वाट पाहून थकलो, आता संघर्ष हाच पर्याय! – अशा भावना महिलांच्या मुखातून व्यक्त होत असून, हा मोर्चा प्रशासनाच्या झोपेचं सावलं तोडणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.