महाराष्ट्र भूषण समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन” –
श्री समर्थ कृपा भजन मंडळाच्या १५ व्या वर्धापन दिनाचा भक्तिमय सोहळ्याचे आयोजन
विरार :(केतन भोज);
वारकरी परंपरेत आध्यात्मिक ओढ,भक्तिभाव आणि सामूहिक साधनेचा प्रसार करणाऱ्या श्री समर्थ कृपा भजन मंडळ,नालासोपारा (विरार)यांच्या वतीने १५ वा वर्धापन दिन रविवार,८ जून २०२५ रोजी साजरा होणार असून,या दिवशी “महाराष्ट्र भूषण समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख” यांचे श्रवणीय,प्रभावी आणि समाजमनाला जागं करणारे कीर्तन भक्तजनांना मोरेश्वर विद्यालयाजवळ,मोरेगाव नाका,विरार रोड,नालासोपारा (पूर्व),ता.वसई,जि.पालघर – ४०१२०९ येथे आयोजन केले आहे.
“संतांची शिकवण आणि भक्तीचा सोहळा” या संकल्पनेतून हा कार्यक्रम सजलेला असून,दिवसभर आध्यात्मिक,सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी दिवसभराचा कार्यक्रम :सकाळी ६.०० वा.–श्री सत्यनारायण महापूजा,सकाळी ८.०० वा. –दीपप्रज्वलन व सामूहिक पालखी सोहळा,स.९.४३ वा.–विशेष गाडी वेळ – विरार ते चर्चगेट दुपारी – पंचपदी परीक्षक सत्कार,नंतर भव्य भजन स्पर्धा स्पर्धा वैशिष्ट्ये १५० पेक्षा अधिक भजन मंडळांचा सहभाग,YouTube Live प्रसारण,दुपारी – स्नेहभोजन,हळदी-कुंकू समारंभ
सायं.५.०० वा.– ह.भ.प. निवृत्तीमहाराज देशमुख यांचे प्रबोधनात्मक कीर्तन
रात्रौ ७.१५ वा.–मान्यवर सत्कार व भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण
या कार्यक्रमा साठी संत सेवा भजन सामाजिक संस्था,संत ज्ञानेश्वर माऊली भजन संस्था यांसह अनेक नामवंत मंडळे सहभागी होणार असून,सामाजिक,शैक्षणिक आणि आध्यात्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे
अध्यक्ष – अरविंद मोरे,संस्थापक – ह.भ.प.विश्वनाथ बांद्रे, कार्याध्यक्ष – प्रणव लांबाडे,खजिनदार – जनार्दन शिंदे (बापू),सचिव – गजानन जोशी,उपाध्यक्ष – राजेश येले,सहखजिनदार – राजुदादा पाडावे, उपसचिव – अनिल बेकरे ,संपर्क प्रमुख – सचिन धाडवे, सदस्य – सत्यवान केसरकर,संदीप तावडे, सुनील पांढरे व इतर कार्यकर्ते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी व सदस्य अत्यंत नियोजनपूर्वक तयारी करत असून,श्री समर्थ कृपा भजन मंडळा तर्फे सर्व वारकरी भक्त,भजनप्रेमी आणि श्रद्धावंत भाविकांना या भक्तिरसात न्हालेल्या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“भक्ती, कीर्तन, आणि संतांची शिकवण यांचा संगम अनुभवण्यासाठी आपण उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.