-4.5 C
New York
Friday, January 16, 2026

Buy now

श्यामाप्रसाद मुखर्जी पूल दुरुस्तीसाठी राहणार बंद

तब्बल पाच दिवस परळीतील श्यामाप्रसाद मुखर्जी पूल दुरुस्तीसाठी राहणार बंद

२६ मे ते ३० जूनदरम्यान वाहतुकीत बदल

येन पावसाच्या तोंडावर सुचलेले शहाणपण

परळी वैजनाथ –

राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-B वरील परळी शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी पूल दुरुस्तीच्या कामासाठी २६ मे २०२५ पासून ३० जून २०२५ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

पुलाची तांत्रिक दुरवस्था लक्षात घेता, अपघाताचा धोका टाळण्यासाठी आणि दुरुस्तीचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असे समजते परंतु अगदी अवकाळी पाऊस सुरू आहे आणि यंदा पावसाळी लवकर आहे अशा घाईत सुरू करण्यात येणारे काम म्हणजे तहान लागली आणि पाणी शोधायला लागले असे झाले असे नागरिकृ बोलत आहेत.

अशावेळी दुरुस्तीच्या कालावधीत वाहतुकीसाठी परळी बायपास हा पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

या कालावधीत वाहतूक सुरळीत राहावी यासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात यावा, अशी मागणी उपविभागीय अभियंता श.म. उरगुडे (रा.मा. उपविभाग, लातूर) यांनी पोलीस अधीक्षक, बीड यांच्याकडे केली आहे.

नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या