-5.4 C
New York
Friday, January 16, 2026

Buy now

गुरुकृपा हि केवलम् ||परळीकरांना भाग्योदयाच्या सेवेची संधी||

*गुरुकृपा हि केवलम् ||परळीकरांना भाग्योदयाच्या सेवेची संधी||*

*चला सहभागी होऊया…!*

“दातव्यम् इति यद् दानं, दीयतेऽअनुपकारिणे” | असे दानाचे महत्व आहे.विसाव्या शतकातील महान संत विभूती सद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज श्रीक्षेत्र चाकरवाडी यांच्या 25 व्या पुण्य स्मरणार्थ अर्थात रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 7 जून ते 14 जून दरम्यान भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व पं. प्रदीपजी मिश्रा यांच्या वाणीतून शिवपुराण कथा आयोजन करण्यात आलेले आहे. या सोहळ्यात शनिवार 14 जून रोजी पूर्णाहुतीचा बहुमान अर्थात या सप्ताहातील सांगतेच्या महाप्रसादाची महापंगत करण्याची संधी परळीकरांना मिळालेला आहे. या दिव्य सोहळ्यात परळीकरांकडे तब्बल 5 लक्ष भाविकांसाठी महाप्रसाद अन्नदानाच्या यजमानपदाचा बहुमान आहे.परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे. या महापंगतीसाठी धान्य व निधीसंकलन सुरु आहे.ज्या भाविक भक्तांची संकल्पित धान्यरूपी सेवा अद्याप जमा केली नसेल अशा भाविकांनी तातडीने धान्यरूपी सेवा जमा करावी.या भव्य दिव्य सोहळ्यात यथाशक्ती सढळ हाताने दान करावे ही विनंती.

– *धान्य व देणगीमूल्य खालील ठिकाणी जमा करा* –
● _बंडूसेठ गरुड श्रद्धा कापड दुकान मोंढा मार्केट,परळी वैजनाथ._ 9422240850
● _संदीपभैय्या लाहोटी यांचे दुकान, परळी वैजनाथ._
9422241924
● _काशिनाथराव देशमुख यांचे आडत दुकान, मोंढा परळी वैजनाथ._
94050 77999

महापंगतीचा खर्च खूप मोठा असून हा शिवधनुष्य सर्वांनी मिळून पेलने गरजेचं आहे… तेंव्हा सर्वांना विनंती की आपण या दिव्य सोहळ्यातील काल्याच्या महाप्रसादाचे अन्नदाते व्हावे!!

*शुभस्य शीघ्रम्!*
*शुभम् भवतु!!*

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या