लाजच उरली नाही, पोट भरत नसेल
भ्रष्टाचाराचा मोठा भंडाफोड :
५ लाखांची लाच घेताना निवासी उपजिल्हाधिकारी रंगेहात अटक
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली. ही कारवाई प्रशासनात खळबळ उडवणारी ठरली आहे.
तक्रारदाराची वर्ग २ ची शेतजमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने लाचेची मागणी केली होती. आधीच २३ लाख रुपये घेतल्याचे तक्रारदाराने ACB कडे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतरही पुन्हा १८ लाखांची मागणी करण्यात आली. या पैकी ५ लाखांची रक्कम घेताना ACB च्या पथकाने सापळा रचून खिरोळकर यांना अटक केली.
विशेष म्हणजे, ही लाच अव्वल कारकून त्रिभुवन यांच्या माध्यमातून स्वीकारली जात होती, असे ACB च्या सूत्रांनी सांगितले. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.
ACB पथकाने सखोल तपास सुरू केला असून, अधिकाधिक माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे.