28.6 C
New York
Thursday, August 14, 2025

Buy now

दिल्लीमध्ये ‘शिवस्वराज भवन’ उभारणीचा ऐतिहासिक संकल्प पूर्णत्वाकडे- लवकरच भव्य उद्घाटन

परळी प्रतिनिधी —

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या अमृत दिनानिमित्त ‘विश्वभूषणराजे शिवछत्रपती चेतना यात्रा’ ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता, संपूर्ण भारतात शिवविचारांचा जागर घडवणारा ऐतिहासिक उपक्रम ठरत आहे.

शिवाजी महाराजांच्या नावावर देशभरात १ लाख ११ हजारांहून अधिक संस्था कार्यरत आहेत. या सर्व संस्थांमध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून, शिवमहाराजांचे विचार, तत्त्वज्ञान आणि स्वराज्यदृष्टी संपूर्ण देशात पोहोचविण्याचा संकल्प या यात्रेमार्फत करण्यात आला आहे.

दिल्लीमध्ये “शिवराज भवन” उभारण्यात येणार असून, हे भवन महाराष्ट्रातील गोरगरिब, विद्यार्थी, शेतकरी, साहित्यिक, पत्रकार आणि समतेच्या विचारांवर काम करणाऱ्या व्यक्तींना निवास व भोजनाची मोफत सुविधा पुरवेल.

काही वेळा शिवछत्रपतींच्या नावावर चालणाऱ्या काही संस्थांद्वारे समाजाला गुमराह केलं जात असल्याचं चित्र समोर येत असल्यामुळे एक राष्ट्रस्तरावरील एक केंद्रीय कार्यालय स्थापन करून संपूर्ण भारतात एकसंघ शिवस्वराज्याची बांधणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येणार आहे.

यासाठी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू घराण्याचे छत्रपती राजे शाहू महाराज यांना अधिकृत पत्र सुपूर्त करण्यात आले असून, लातूरचे मा.खासदार डॉक्टर शिवराज काळगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दिल्लीत मूर्त स्वरूपात साकारला जाणार आहे.

लातूर पॅटर्नप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देणारे तज्ज्ञ, शिक्षक आणि अभ्यासक्रम सुविधा दिल्लीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दिल्लीतील शिवराज भवनमध्ये साहित्यिक, संपादक, शेतकरी, विद्यार्थी, महिला, सामाजिक कार्यकर्ते अशा सर्व थरातील व्यक्तींना सन्मानित करून बहुजन चळवळीला नवा आयाम दिला जाईल.

हे ‘ शिवस्वराज भवन’ केवळ वास्तू नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीच राष्ट्रपातळीवरील प्रतिनिधित्व ठरेल असा निर्धार चेतना यात्रेचे जनार्दन पाटील यांनी सांगितले

प्रमुखांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आभार मराठा सेवा संघाचे संजय सुरवस

दिल्लीमध्ये ‘शिवस्वराज भवन’ उभारणीचा ऐतिहासिक संकल्प पूर्णत्वाकडे- लवकरच भव्य उद्घाटन

नवी दिल्ली —

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या अमृत दिनानिमित्त ‘विश्वभूषणराजे शिवछत्रपती चेतना यात्रा’ ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता, संपूर्ण भारतात शिवविचारांचा जागर घडवणारा ऐतिहासिक उपक्रम ठरत आहे.

शिवाजी महाराजांच्या नावावर देशभरात १ लाख ११ हजारांहून अधिक संस्था कार्यरत आहेत. या सर्व संस्थांमध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून, शिवमहाराजांचे विचार, तत्त्वज्ञान आणि स्वराज्यदृष्टी संपूर्ण देशात पोहोचविण्याचा संकल्प या यात्रेमार्फत करण्यात आला आहे.

दिल्लीमध्ये “शिवराज भवन” उभारण्यात येणार असून, हे भवन महाराष्ट्रातील गोरगरिब, विद्यार्थी, शेतकरी, साहित्यिक, पत्रकार आणि समतेच्या विचारांवर काम करणाऱ्या व्यक्तींना निवास व भोजनाची मोफत सुविधा पुरवेल.

काही वेळा शिवछत्रपतींच्या नावावर चालणाऱ्या काही संस्थांद्वारे समाजाला गुमराह केलं जात असल्याचं चित्र समोर येत असल्यामुळे एक राष्ट्रस्तरावरील एक केंद्रीय कार्यालय स्थापन करून संपूर्ण भारतात एकसंघ शिवस्वराज्याची बांधणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येणार आहे.

यासाठी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे प्रतिनिधी खासदार श्रीमंत राजे शाहू महाराज यांना अधिकृत पत्र सुपूर्त करण्यात आले असून, त्यांच्या व लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दिल्लीत मूर्त स्वरूपात साकारला जाणार आहे.

लातूर पॅटर्नप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देणारे तज्ज्ञ, शिक्षक आणि अभ्यासक्रम सुविधा दिल्लीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दिल्लीतील शिवराज भवनमध्ये साहित्यिक, संपादक, शेतकरी, विद्यार्थी, महिला, सामाजिक कार्यकर्ते अशा सर्व थरातील व्यक्तींना सन्मानित करून बहुजन चळवळीला नवा आयाम दिला जाईल.

हे ‘ शिवस्वराज भवन’ केवळ वास्तू नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीच राष्ट्रपातळीवरील प्रतिनिधित्व ठरेल असा निर्धार चेतना यात्रेचे प्रमुख जनार्दन पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार मराठा सेवा संघाचे संजय सुरवसे सर यांनी मानले.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या