-5.5 C
New York
Friday, January 16, 2026

Buy now

संत गजानन महाराज पालखी सोहळा भक्तिमय उर्जेनं उजळला – माऊंट लिटरा झी स्कूलचं अनोखं सेवाकार्य

संत गजानन महाराज पालखी सोहळा भक्तिमय उर्जेनं उजळला – माऊंट लिटरा झी स्कूलचं अनोखं सेवाकार्य

दैनंदिन उपयोगी साहित्याचे वाटप..

 

परळी प्रतिनिधी

शेगाव निवासी संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन आज परळी येथे झाले आहे. यावेळी गंगाखेड रोड लगत असलेल्या माऊंट लिटरा झी स्कूलच्या वतीने या पालखीतील वारकरी भक्त मंडळींचे भक्ती भावाने शाळेच्या समोर स्वागत करण्यात आले.

दादाहरी वडगाव येथील दुपारचा विसावा घेऊन परळी शहराकडे आगमन करणाऱ्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे माऊंट लिटरा झी स्कूलच्या वतीने आज गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वागत करण्यात आले.
यावेळी वारकरी व भक्त मंडळींना दैनंदिन लागणाऱ्या खोबऱ्याचे तेल, अंगाची साबण, टूथपेस्ट ब्रश, शाम्पू आदी दैनंदिन वापरात येणाऱ्या साहित्याचे यावर्षी एक सेवाभाव या उद्देशाने वाटप करण्यात आले.

यावेळी माऊंट लिटरा झी स्कूलचे सुप्रसिद्ध डॉक्टर हरिश्चंद्र वंगे (दादा),सौ.भारतीताई वंगे,कैलास घुगेसर,सौ.सारिकाताई घुगे,सौ.सुनिताताई घुगे , वंगे व घुगे परिवार, सौ.प्राचार्य मंगेश काशीद सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर, महिला कर्मचारी व सुरक्षारक्षक आदींनी भक्ती भावाने शाळेतील प्रवेशद्वारावर त्यांचे स्वागत केले.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या