जनसंग्राम संघटनेच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या परळी तालुकाध्यक्षपदी वाहब पटेल तर शहराध्यक्षपदी शेख हबीब मिस्त्री यांची निवड
परळी, (प्रतिनिधी) :-
“नेक कर्म, मानवता हाच धर्म ” हे ब्रीद घेऊन निघालेल्या जनसंग्राम संघटनेच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या परळी तालुका अध्यक्षपदी वाहब पटेल तर परळी शहराध्यक्षपदी शेख हबीब मिस्त्री यांची निवड नुकतीच करण्यात आली. वाहब पटेल व शेख हबीब मिस्त्री यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
जनसंग्राम संघटनेच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत संस्थापक अध्यक्ष तुळशीराम पवार यांच्या हस्ते वाहब पटेल व शेख हबीब मिस्त्री यांच्या निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच त्यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जनसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुळशीराम पवार यांच्यासह अकबर हमीद कुरेशी, संजय इंगळे, परशुराम धावणे, नितीन पोटभरे, रवी प्रकाश सिताफ, संतोष गणपत मुंडे, राधाकिशन गुंडकर, शेख खलील, शेख मुजाहिद जिलानी, अशोक नानवटे, शिवाजी बळवंत, शेख सोहेल, अकबर जहागीरदार, शेख तय्यब, रमेश साबळे
आदींची उपस्थिती होती.
*जनसंग्राम चे कार्य जोमाने करणार*
जनसंग्राम संघटनेच्या माध्यमातून वंचित, शोषित, पीडित घटकाचे प्रश्न मार्गी लावणार आहे. जनसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुळशीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्य जोमाने करणार असून जनसंग्राम संघटना मजबूत करण्यासाठी अल्पसंख्यांक आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे यावेळी जनसंग्राम अल्पसंख्यांक आघाडीचे परळी तालुका अध्यक्ष वाहब पटेल यांनी यावेळी बोलताना सांगितले.