वैद्यनाथ मंदिरात श्रावण सोमवारी
पुजाऱ्याची दानाची रक्कम हिसकावली
मंदिर प्रशासनाकडून यावर अद्याप कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
एक पुजारी रुग्णालयात दाखल प्रकृती स्थिर
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –
पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असताना, मंदिर परिसरात एक संतापजनक घटना घडली. पुजाऱ्यांकडून दानाची रक्कम हिसकावून घेण्यात आली अशी सूत्रांकडून माहिती कळत आहे.
काही पुजारी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन येथे गेले होते परंतु तक्रार दाखल झाली नाही अशी माहिती कळते आहे.
यामध्ये एका पुजाऱ्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, या प्रकारामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता अशी सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, मंदिर प्रशासनाकडून यावर अद्याप कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
या प्रकारामुळे श्रद्धाळूंमध्ये नाराजीचे वातावरण असून, मंदिर व्यवस्थापनाची पारदर्शकता आणि सुरक्षा यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.