25.9 C
New York
Sunday, August 24, 2025

Buy now

कवी शिक्षक अनंत मुंडे सर यांच्या मातोश्री किसाबाई आप्पाराव मुंडे यांचे दिर्घ आजाराने दुःखद निधन

कवी शिक्षक अनंत मुंडे सर यांच्या मातोश्री किसाबाई आप्पाराव मुंडे यांचे दिर्घ आजाराने दुःखद निधन

रविवार दि. २४ रोजी सकाळी त्यांच्या गावी वाका ता. परळी येथे सकाळी ठीक ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

——–

मराठवाडा साहित्य परिषद परळीचे कार्याध्यक्ष तथा मराठवाडा शिक्षक संघाचे शहर प्रसिध्दी प्रमुख अनंत मुंडे सर यांच्या मातोश्री किसाबाई आप्पाराव मुंडे यांचे दिर्घ आजाराने आज शनिवार दि. २३ रोजी रात्री ९ वाजता दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ९५ होते.
किसाबाई या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या व मनमिळावू स्वभावाच्या होत्या.त्यांच्या मुखात सतत हरिनामाचे नाव असे. त्यांच्या पश्चात अनंत मुंडे सर यांच्या सह आठ पुत्र आहेत. त्यांचा पार्थिवावर आज रविवार दि. २४ रोजी सकाळी त्यांच्या गावी वाका ता. परळी येथे सकाळी ठीक ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या