काँग्रेस सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन जि.प. पं.स. व नगरपालिकाच्या निवडणुका लढवणार-बहादुरभाई
परळी प्रतिनिधी आगामी होऊ घातलेल्या घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका महाविकास आघाडी व समविचारी पक्षांना सोबत घेऊन पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार असल्याचे परळी शहराचे अध्यक्ष बहादूरभाई यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
अवघ्या काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीला हद्दपार करण्यासाठी काँग्रेससह महाविकास महाविकास आघाडीने जोरदार तयारी करण्यात आली आहे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबतच इतर समविचारी पक्षांनाही या निवडणुकीत सहभागी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे अध्यक्ष बहादुर भाई यांनी सांगितले.
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जात असताना शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या व सर्वसामान्य जनतेला विकासाच्या नावावर भ्रष्टाचाराचा कळस करत लुटणाऱ्या महायुतीच्या ध्येय धोरणाला प्रचंड विरोध करत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून सर्वसामान्य जनता आपल्या सोबत घेऊन महायुतीला हद्दपार करण्यासाठी आता कंबर कसली आहे. यासाठी निवडणुकीची तयारी पूर्वनियोजित करण्यासाठी लवकरच सर्व समविचारी पक्षाबरोबर व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी सांगितले.