0.3 C
New York
Monday, February 23, 2026

Buy now

जलालपूर येथील केशव साबळे यांना धमकी- परळी येथील संभाजीनगर पोलिसांत एनसीआर दाखल

जलालपूर येथील केशव साबळे यांना धमकी

परळी येथील संभाजीनगर पोलिसांत एनसीआर दाखल

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :

जलालपूर येथील केशव साबळे यांना शिवीगाळ व धमकी दिल्याच्या प्रकरणी परळी येथील संभाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची (N.C.R.) नोंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. २५ जानेवारी २०२६ रोजी घडलेल्या घटनेबाबत एनसीआर क्रमांक 0013/2026 अंतर्गत नोंद करण्यात आली असून प्रकरणाची प्राथमिक नोंद पोलिसांनी केली आहे.

दाखल माहितीनुसार, २५ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १५.४६ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर रात्री १९.५३ वाजता संबंधित बाबींची परळी शहर पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली असून . तक्रारीत केशव साबळे यांना आपल्याला फोनद्वारे वारंवार संपर्क साधत शिवीगाळ करणे, धमकी देणे व मानसिक त्रास देण्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन पुढील तपास करत आहेत.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या