22.5 C
New York
Friday, August 22, 2025

Buy now

रेल्वे स्टेशन ऑटो पॉइंट चा प्रश्न सुटला

रेल्वे स्टेशन ऑटो पॉइंट चा प्रश्न सुटला
परळी प्रतिनिधी. परळी स्टेशन रेल्वे परिसरात रेल्वे मार्गाने येणाऱ्या प्रवासासाठी ऑटो चालक आपला ऑटो कुठेही उभे करीत होते हा प्रश्न रेल्वे अधिकारी व पोलिसांशी संवाद साधून सोडीला असल्याने आता रेल्वे स्टेशन ऑटो पॉईंटचा प्रश्न सुटल्याचे रेल्वे स्टेशन ऑटो चालक संघटनेचे अध्यक्ष बाबा शेख यांनी म्हटले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून परळी रेल्वे स्टेशन या ठिकाणी ऑटो चालक बेशिस्त ऑटो लावीत होते. रेल्वेने उतरणाऱ्या प्रवाशांना ऑटोकडे येण्यासाठी रस्ता सुद्धा नव्हता. ऑटो चालकांच्या ऑटो पॉईंट नसल्यामुळे या ठिकाणी अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. पत्रकार बाबा शेख यांनी सर्व ऑटो चालक यांच्याशी संवाद साधून समस्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. व सर्व ऑटो चालक यांनी ठराव केला की परळी रेल्वे स्टेशन ऑटो युनियन अध्यक्ष म्हणून त्यांचे निवड करण्यात आली. व त्यांनी अध्यक्ष यांचा पदभार सांभाळताच ऑटो रिक्षा शिस्तीत व एका लाईनीने प्रवाशांना सुरक्षित घरपोच करतात. आणि या ठिकाणी घाणीचे साम्राज्य झाले होते वेळोवेळी पाठपुरावा करून रेल्वे कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बाहेरून येणारे नागरिक मुतारी नसल्यामुळे रेल्वे स्टेशन हद्दीमध्ये येऊन लघुशंका करतात व याचा दुर्गंध येणाऱ्या सर्व स्टेशनमध्ये नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता.
यांच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. याचीच दखल घेऊन एच. आय. श्री. गुप्ता सर यांनी घेऊन स्वच्छता करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या