22 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा.प्रशांत सुधीर गोळे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा.प्रशांत सुधीर गोळे यांची नियुक्ती
वाशीम दि.23:(अजय ढवळे )
प्रा.प्रशांत गोळे यांची राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईत त्यांना नियुक्तीपत्र युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या मान्यतेने दिले. प्रा. प्रशांत गोळे हे माझी जिल्हा परिषद सभापती सुधीर पाटील गोळे यांचे चिरंजीव आहेत. याआधी त्यांच्या वडिलांनी तालुक्यासह जिल्ह्यामध्ये विविध पदे जसे की अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती,बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड संचालक, सभापती जिल्हा परिषद, सदस्य ग्रामपंचायत इत्यादी पद्य भूषवले. त्यांचा राजकीय सामाजिक वारसा घेऊन अल्पावधीतच गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये समाजकारणासह राजकारणामध्ये उत्तुंग भरारी घेतली. कदाचित स्व.अरुण बाबा इंगोले तथा स्व.विनायक मेटे त्याच्याशी असलेले सौख्य सुद्धा कामी आले असावे;
प्रा.प्रशांत गोळे म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबुतीने उभी करण्यास हातभार प्रामाणिकपणे करीन ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
माझ्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तथा पार्थ दादा पवार आणि सुरज भाऊ चव्हाण , जिल्हाध्यक्ष वाशिम व तसेच महाराष्ट्रात सह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठांनी शिफारस करून ही मोठी जबाबदारी टाकली. पक्षाने दिलेल्या जबाबदारीला योग्य न्याय देताना अजित दादांनी टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून अजितदादा च्या विचाराचा आमदार रिसोड – मालेगाव मतदार संघात आणण्यासाठी जीवाचे रानकरू ही इच्छा देखील व्यक्त केली.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या