मनाची प्रसन्नता व एकाग्रता साधण्यासाठी अंबाजोगाई येथे ४ व ५ मे रोजी दोन दिवसीय ‘समता विपश्यना शिबिराचे आयोजन
*आयोजक सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले व शिक्षण तज्ज्ञ प्रा.नागेश जोंधळे यांची माहिती*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई येथे प्रथमच जागतिक ख्यातीचे संशोधक तथा शास्त्रज्ञ डॉ.लिम सिओ जीन (मलेशिया) ,आय.आय.टी.खरगपूर तथा शून्यती इंटरनॅशनल फाउंडेशन चे संस्थापक यांच्या आधुनिक पद्धतीने वैज्ञानिक संशोधनावर आधारित जगातील २०० देशांमध्ये सुपरिचित असलेले शून्य-ध्यान मेडिटेशन या शिबिरासाठी सुन्नती इंटरनॅशनल फाउंडेशनचे संस्थापक व जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ज्ञ डॉ.लिम सियो जिन (मलेशिया), डॉ.राजेश सवेरा (संचालक, सिफ, पुणे व भारत), प्रा.विनय सोनुले – केंद्रीय समन्वयक, सिफ नागपूर, यांच्या मार्गदर्शनाखाली आता आपल्या अंबाजोगाई मध्ये प्रख्यात आरोग्य तज्ज्ञ तथा आईरत्न डॉ.प्रशांत दहिरे, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा मनाचे डॉक्टर म्हणून ख्याती असलेले डॉ.राजेश इंगोले व आई सेंटर प्रोचे संस्थापक, सुप्रसिद्ध लेखक तथा विश्वविक्रमवीर प्रशिक्षक नागेश जोंधळे यांच्या पुढाकाराने शून्य ध्यान मेडिटेशन – दोन दिवसीय शिबीर शनिवार, दिनांक 4 मे व रविवार 5 मे 2024 रोजी हॉटेल पियुष इन, अंबाजोगाई येथे होत आहे.
आजच्या या धकाधकीच्या जीवनात व स्पर्धामय युगात शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते प्रशासनातील उच्च पदावरील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंत, अध्यात्म व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे धर्मगुरू, राजकीय नेते, डॉक्टर्स, इंजिनियर्स, शिक्षक, प्राध्यापक, पालक, वकिल तसेच उद्योग व इतर अनेक क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असणारे अनेक दिग्गज मंडळींनी दैनंदिन जीवनातील तथा वैयक्तिक व कौटुंबिक ताण-तणावातून वा मन-मोकळेपणाने व्यक्त न होता आल्यामुळे तसेच मोबाईल, कॉम्प्युटर, इंटरनेट व सोशल मिडियाच्या अतिरेकामुळे सोबतच तंबाखू, गुटखा, मटका, दारू, पोर्न, ड्रग्स, अंमली पदार्थ इत्यादींच्या सेवनामुळे व्यसनाधीन झालेले असंख्य तरूण-तरूणींनी ऐन उमेदीच्या काळात स्वतःची बहुमोल जीवनयात्रा संपविली व यामुळे त्यांचे स्वतः सहित परिवाराचे, समाजाचे व देशाचे हे मोठे नुकसान होत आहे. वरील सर्व समस्यांवरवर प्रभावशाली व सर्व गुणकारी उपाय म्हणजे नियमित ध्यान धारणा करणे, आपल्या मनातील विचारांना सुयोग्य असे संस्कार करून स्वतःला मानसिकरित्या अधिक मजबूत बनवण्यासाठी सुन्यती इंटरनॅशनल फाउंडेशन, समाधान रुग्णालय, आई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य असणारे आई सेंटर प्रो व इंग्लिश विंग्स प्री प्राइमरी स्कूल इंडियन मेडिकल असोसिएशन,महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे व नागपूर या महानगरानंतर प्रथमच सुसंस्कृत शहर म्हणून नांवलौकिक असलेल्या अंबाजोगाई येथे हे ध्यान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. या दोन दिवसीय शिबिराचे वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात असंख्य असे फायदे अनुभविण्यासाठी तसेच मर्यादित प्रवेश असल्यामुळे आपली पूर्व नांव नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आई सेंटर प्रो कॅम्पस, संत सावता माळीनगर, अंबाजोगाई येथे प्रत्यक्ष भेट देऊन या ९६२३६४६९४४ / ८८०६६४३९४४ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या शिबिरामुळे आपल्या ताणतणाव युक्त जीवनात या ताणतणावास योग्य प्रकारे कसे हाताळावे, विपरीत परिस्थितीत सकारात्मक मानसिकता कशी बनवावी, दैनंदिन जीवनात मन स्थिर कसे ठेवावे आणि आयुष्यात विजेत्यांची मानसिकता कशी तयार करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन जगविख्यात तज्ज्ञांच्या मार्फत करण्यात येणार आहे तरी आपल्या स्वतःसाठी वा आपल्या नातेवाईकांच्या फायद्यासाठी सर्व अंबाजोगाइकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.राजेश इंगोले, प्रा.नागेश जोंधळे, डॉ.प्रशांत दहिरे व इतर आयोजकांनी केले आहे.
=======================