8.2 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

उपमुखमंञी पवार यांनी केले आ. बाळासाहेब आजबेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

अजित दादा म्हणाले आपल्याला महियुतीच सरकार आणायचे

त्यासाठी घड्याळाच्या चिन्हाच्या पुढच बटन दाबायचे

  1. आ. बाळासाहेब आजबेंच्या उमेदवारीवर केले शिक्कामोर्तब

आष्टी, दि. 29 ( लोकाशा न्युज ) मुख्यमंञी लाडकी बहिण योजना विरोधकांना बंद पाण्याची आहे. परंतु ती योजना आम्ही पुढील पाच वर्षा तरी बंद पडून देणार नाहित. त्यासाठी आपले सरकार आणायचे आहे. आष्टी- पाटोदा- शिरूर तालुक्यातील भगिनींनी लक्षात घ्यावे. त्यासाठी आपल्याला घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबायचे आहे. असे सांगत एक प्रकारे आ. बाळासाहेब आजबे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असल्याचे बोलले जात आहे. ते आष्टी येथिल जनसन्मान याञे निमित्त आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.
राज्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सह इतरत्र घटक पक्षांनी एकञ येत महायुती अस्तित्वात आणली आहे. या महायुतीच्या जन्मानंतर राज्यात अनेक राजकिय समीकरणे बसलेले आहेत. याचाच फटका आष्टी विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवार ला बसणार आहे. विधानसभेची निवडणुक अजुन जाहिर झाली नसली तरी आपल्याच उमेदवारी मिळावी यासाठी आष्टी तालुक्यातील इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे. अशातच आज दि. 29 ऑगष्ट रोजी आष्टी येथे राष्ट्रवादी काँग्रेस ची जनसन्मान याञा आली होती. या याञे निमित्त झालेल्या जाहिर सभेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला आशिर्वाद द्या व आष्टी , पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील भगिनींनी मतदान करतांना घड्याळाच्या समोरचे बटन दाबावे असे आव्हान केल्याने आष्टी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे राजकिय जानकरांकडू बोलले जात आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या