23.9 C
New York
Saturday, August 16, 2025

Buy now

नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी संतोष रोडे यांना पितृशोक, उद्या राख सावडण्याचा कार्यक्रम

नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी संतोष रोडे यांना पितृशोक, उद्या राख सावडण्याचा कार्यक्रम

परळी/ प्रतिनिधी

परळी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी संतोष रोडे यांचे वडील व आदर्श शिक्षक स्मृतीशेष धोंडीराम किसनराव रोडे गुरुजी यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दिनांक 23 रोजी दुखद निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवार दिनांक 24 रोजी सकाळी 11 वाजता शांतीवन स्मशानभूमी, भीम नगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान उद्या मंगळवारी सकाळी 8 वाजता राख सावडण्याचा कार्यक्रम होणार आहे.
स्मृतीशेष धोंडीराम रोडे गुरुजी हे एक आदर्श शिक्षक म्हणून परिचित होते. त्यांना बीड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी आपल्या सेवेत सर्वाधिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरवट येथे घालविला आहे. ते संतोष रोडे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दुसरा मुलगा वैद्यनाथ विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मृत्यू समय रोडे गुरुजी यांचे 85 वर्षे वय होते.
स्मृतीशेष धोंडीराम किसनराव रोडे गुरुजी यांचे फुले, शाहू आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान होते. उद्या दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 8 वाजता शांतीवन स्मशान भूमी , भीम नगर येथे राख सावडण्याचा कार्यक्रम होणार असल्याचे कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या