पाच तासात दोषारोपपत्र न्यायालयासमोर दाखल परळी पोलिसांची वेगवान कामगिरी…. !
📍घटनाक्रम –
➡️सकाळी 10.33 वाजता गुन्हा दाखल
➡️गुन्हातील आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले.
➡️वरिष्ठ कार्यालयाकडून कागदपत्राचे पडताळणी करून आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल
➡️गुन्ह्याचा तपास सपोनि योगेश शिंदे यांनी केला
➡️गुन्ह्याचे दोषारोप अवघ्या पाच तासात न्यायालयासमोर सादर केले
➡️परळी पोलीसांनी जलदगती तपास करीत या गुन्ह्याचे दोषारोप अवघ्या पाच तासात न्यायालयासमोर सादर केले
➡️परळी पोलीसांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली
परळी –
परळी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान कडबा मार्केट वखार महामंडळाच्या मोकळ्या जागेतील झाडेझुडपे असलेल्या ठिकाणी महिलांना अतिशय लज्जास्पद वाटणारा गुन्हा घडला आहे. मोकळ्या जागेतील झाडेझुडपे असलेल्या ठिकाणी प्रात:विधीसाठी काही महिला या गेलेल्या असताना त्या ठिकाणी एक आरोपी हा तिथे दबा धरून बसला होता. प्रात:विधीसाठी बसलेल्या महिलांच्या समोर जाऊन व महिलांना मनाला लज्जास्पद वाटणारे वर्तन व अश्लील कृती त्याने केल्या.तसेच येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना वाईट उद्देशाने इशारे केले. या बाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यावरून गु र न 67/2025 कलम – 74,75(2 ),79 BNS प्रमाणे सकाळी 10.33 वाजता आरोपी भुजंग वाघमारे वय २८ वर्षे रा.रामनगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ यांनी हे प्रकरण गांभीर्यपूर्वक घेऊन दाखल गुन्हातील आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले. त्याचेकडे व साक्षीदारांकडे तपास करुन आरोपीविरुद्ध पुरावा मिळून आल्याने,वरिष्ठ कार्यालयाकडून कागदपत्राचे पडताळणी करून आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे, दोषारोप नंबर.33/25 सह कोर्टात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. न्यायालयात एस एस सी क्रमांक 151/25 दि.28/3/2025 असा प्राप्त आहे. या गुन्ह्याचा तपास सपोनि योगेश शिंदे यांनी केला आहे. महिला विषयांच्या प्रकरणांमध्ये तात्काळ कारवाई करण्याचे वरीष्ठचे आदेश आहेत. त्यानुसार परळी पोलीसांनी जलदगती तपास करीत या गुन्ह्याचे दोषारोप अवघ्या पाच तासात न्यायालयासमोर सादर केले आहे. परळी पोलीसांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली. या प्रकरणात जलदगती तपासासाठी पोलीस अधीक्षक नवनीत, अप्पर पो. अधीक्षक श्रीमती चेतना, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे स्तरावर पो निरीक्षक रघुनाथ, सपोनि योगेश ,नितीन, मपोहे सविता, गोविन्द, किशोर पो. शि.पंडीत, रामकिशन, धनश्री,वर्षा, यांनी कामगिरी केली. जलदगती तपास वेळेत पुर्ण करुन अवघ्या 05 तासात दाखल गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले. अतिशय वेगवान झालेल्या या सर्व प्रक्रिया बाबत जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे.