23.5 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

जे. के. कन्स्ट्रक्शनच्या वतीने आज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार थाटात विवाह सोहळा

◾जे. के. कन्स्ट्रक्शनच्या वतीने आज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार थाटात विवाह सोहळा

 

◾समाजासाठी आदर्श उपक्रम

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

 

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात देत, परळी येथील जे. के. कन्स्ट्रक्शन या बांधकाम क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्थेने एक सामाजिक बांधिलकी जपत मुस्लिम धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा भव्य विवाह सोहळा येत्या ४ मे रोजी सकाळी ११ वाजता जे. के. फंक्शन हॉल, मलकापूर रोड, परळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आणि थाटामाटात पार पडणार आहे.

संस्थेचे संचालक जाफर खान आणि हाजी राजा खान यांनी सांगितले की, “आजच्या काळात विवाह सोहळ्यांवर होणारा अनावश्यक खर्च अनेक कुटुंबांवर आर्थिक बोजा टाकतो. अशा परिस्थितीत समाजातील गरीब व गरजू कुटुंबांना आधार देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.” समाजातील प्रतिष्ठा, रूढी-परंपरा यामुळे अनेक गरीब पालक आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी कर्जबाजारी होतात. ही स्थिती बदलण्यासाठी आणि एक सशक्त सामाजिक संदेश देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सामूहिक विवाह सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी २५ एप्रिलपर्यंत मुफ्ती शेख सय्यद यांच्याकडे आणि मॅनेजर शफिक (९८३४५०७२०१) यांच्याकडे नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नवविवाहित दांपत्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा, वस्त्र, भोजन आणि इतर खर्च संस्थेच्या वतीने मोफत दिला जाणार आहे.

या उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये जाफर खान उस्मान खान, हाजी राजा खान उस्मान खान, उमर खान उस्मान खान, वाहेद खान जाफर खान, शाहेद खान राजा खान, शेख माहरुद्दिन अलीमोदिन, जफर खान जाफर खान, नदीम खान जाफर खान, हाफेज तारेक खान एजाज खान, फेरोज खान उमर खान, अशफाक (९८५०५६५५४१), एजाज खान उस्मान खान (९८२२५१३५१३), फाजेब खान उमर खान, आणि तौफिक खान एजाज खान यांचा समावेश आहे.

हा सामूहिक विवाह सोहळा केवळ विवाहबंधनाचा क्षण नाही, तर समाजात ऐक्य, मदतीची भावना आणि सामाजिक समतेचा आदर्श निर्माण करणारा प्रेरणादायी प्रसंग ठरणार आहे. या उपक्रमातून ‘सामाजिक उत्तरदायित्व’ कशाला म्हणतात याचा प्रत्यय येतो आणि इतरांनीही अशा कार्यातून प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या