-5.4 C
New York
Friday, January 16, 2026

Buy now

माळेगाव शिवारात अवैध गांजावर धडक कारवाई! – केजच्या एएसपी कमलेश मीना यांच्या पथकाची मोठी यशस्वी मोहीम

माळेगाव शिवारात अवैध गांजावर धडक कारवाई! – केजच्या एएसपी कमलेश मीना यांच्या पथकाची मोठी यशस्वी मोहीम

युसुफ वडगाव (प्रतिनिधी):

गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील मौजे माळेगाव शिवारात छापा टाकून तब्बल 19.7 किलो वजनाच्या गांजाच्या झाडांची बेकायदेशीर शेती उध्वस्त केली आहे. ही कारवाई 23 जून 2025 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक केज श्री कमलेश मीना यांच्या नेतृत्वाखाली केली गेली.

या कारवाईसाठी बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके, यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कमलेश मीना यांच्या विशेष पथकातील प्रो-DYSP श्रीमती पूजा पवार, पो.ह. बालासाहेब (996), पो.ना. दिलीप (1837), अनिल (10/35) आणि राजू (1860) तसेच सपोनी मच्छिंद्रनाथ (वडगाव पोलीस स्टेशन), ओह. संपत (15/31), पोह. सिताराम (1291) यांचा या कारवाईत सक्रिय सहभाग होता.

छाप्यात दोन ते नऊ फूट उंचीच्या गांजाच्या झाडांची अवैध शेती आढळून आली.
शासकीय पंचनामा व मोजमापानंतर निष्पन्न झाले की सिद्धेश्वर तुकाराम ठोंबरे (रा. सुरडी, ता. केज, जि. बीड) याने ही बेकायदेशीर लागवड करून गांजाची संवर्धन आणि जोपासना केली होती.

या प्रकरणी पोलीस नाईक दिलीप (1837) यांच्या फिर्यादीवरून ठोंबरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई म्हणजे गांजा तस्कर व बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांना मिळालेला स्पष्ट इशारा आहे की, कुठल्याही गुन्हेगारी कृतीला बगल दिली जाणार नाही, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या