-
प्रतिनिधी- सोपान पगारे
आष्टी तालुक्यातील सर्व शेतकरी व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की,मागील 24 तासांपासून तालुक्यामध्ये सर्व महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी अतिवृष्टीजन्य परिस्थिती झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आष्टी तालुक्यातील दौलावडगाव,धामणगाव,धानोरा प्रामुख्याने जिल्हा परिषद गटात ढगफुटी झाली असल्याने सर्व प्रकल्प,नदया तुडूंब भरून वाहत आहेत.
अनेक ठिकाणी रस्त्यावरील फुलावरून पाणी वाहत आहे.रस्ता पार करण्याचा प्रयत्न करू नये.विद्युत पुरवठा व अन्य बाबतीमध्ये सतर्कता बाळगावी.
या अतिवृष्टीजन्य पावसाचे माहिती तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार दिली आहे. संबंधित महसूल मंडळातील सर्वांनी काळजी घ्यावी,आम्ही आपल्या मदतीसाठी तत्पर आहोत.
—–आ.सुरेश आण्णा धस.