आपल्या वाट्याला आलेलं दुःख हे जगापेक्षा खूप कमी आहे असं समजाल तर आनंदी व्हाल !
स्व. श्यामरावजी देशमुख स्मृति व्याख्यानमालेत संजय कळमकर यांचे प्रतिपादन

गोल पॉइंटर⬇️
हसवता–हसवता अंतर्मुख करणारे कळमकर
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
आपल्या वाट्याला आलेलं दुःख हे जगापेक्षा खूप कमी आहे . असे समजाल तर आनंदी व्हाल..
स्व श्यामरावजी देशमुख स्मृति व्याख्यानमालेत संजय कळमकर यांनी प्रतिपादन केले.ते येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. श्यामरावजी देशमुख (काका ) स्मृतिसमारोहात मंगळवारी (ता.२०) बोलत होते.
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात स्व श्यामरावजी देशमुख स्मृतिसमारोहात जगण्यातल्या आनंदाच्या वाटा’ या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते संजय कळमकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . या व्याख्यानातून त्यांनी जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी दिली .
स्पर्धेने आनंद नष्ट करू नका,अकारण चिंतेने आनंदावर विरजण पडते. घराघरांत कुटुंबीयांमधील सुसंवाद आनंदनिर्माण करतो. स्वैराचाराने आनंद भोगू नका, आनंद जवळ कुटुंबांत असताना बाहेर शोधण्याचा प्रयत्न करू नका, कधी नितळ हास्य – कधी मंत्रमुग्धता – कधी अंतर्मुख करत करत करत जीवनातील आनंद शोधणाऱ्या या व्याख्यानाने परळीकरांना आनंद दिला.
आपल्या वाट्याला आलेलं दुःख हे जगापेक्षा खूप कमी आहे. असे समजाल तर आनंदी रहाल, दैनंदिन जीवनात आनंद निर्माण करण्याचे प्रभावी मार्ग यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. आपल्या सहज, ओघवत्या शैलीत हसवता–हसवता अंतर्मुख करणारे कळमकर यांचे व्याख्यान श्रोत्यांसाठी एक बौद्धिक व भावनिक समृद्धी देणारी पर्वणी ठरली. स्व . काकांच्या स्मृति सोहळ्यानिमित्त घेण्यांत आलेल्या सामूहिक लोकनृत्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये महर्षी कणाद विद्यालय या विद्यालयाच्या संघाने सादर केलेले हरियाणवी लोकनृत्य प्रथम, द्वितीय पारितोषिकाचे मानकरी श्री शिवछत्रपती विद्यालय, आश्रम शाळा वसंतनगर या शाळेचे बंजारा गीत याने सर्वतृतीय क्रमांक प्राप्त केला . या यशस्वी संघांना संजय कळमकरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यांत आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय देशमुख हे लाभले यावेळी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनिलराव देशमुख, सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्या डॉ. विद्या देशपांडे यांच्या मार्गदर्शनाने यशस्वी झालेल्या या कार्यक्रमात डॉ विनोद जगतकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा डॉ राजकुमार यल्लावाड यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा अरुण चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरुण चव्हाण, प्रा. डॉ. पी. व्ही. गुट्टे, प्रा. डॉ. कचरे एस. व्ही. प्रा. अशोक पवार, प्रा. अशिलता शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .
या प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, महिला वर्ग व परळीतील अभ्यासक साहित्यप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती ही लक्षवेधक ठरली .









