लाडली बेटिया चित्रपटाच्या शोला परळीत प्रेक्षकांची तुफान गर्दी,
परळी (अमोल सुर्यवंशी) : बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लाडली बेटिया या चित्रपटाच्या परळी येथील शोला परळीकरांची तुफान गर्दी झाली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, तसेच निर्माते प्राध्यापक एस एस देशमुख व अभिनेते नागेश्वर खंदारे यांच्या उपस्थितीत शोचे उद्घाटन करण्यात आले. बी. एस. जोगदंड प्रस्तुत आणि वैष्णव देवा दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अभिनेते यश पंडित व अभिनेत्री अलंकारिता बोरा, नागेश्वर खंदारे, सुरेंद्र पाल, शालिनी कपूर यांची प्रमुख भूमिका आहे.
नवकिरण फिल्म्स व बीड जिल्हा पोलीस फौंडेशन च्या वतीने आयोजित लाडली बेटीया या
चॅरिटी शो परळी येथील नाथ चित्र मंदिरात आजपासून सुरू झाला. चित्रपटाला सुरुवात होण्यापूर्वी चित्रपटात उत्कृष्ट भूमिका करणारे नागेश्वर खंदारे यांचा सिनेमा परळी पत्रकार संघ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला चित्रपटास संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, सुरेश टाक पंचायत समिती माजी सभापती विष्णुपंत देशमुख, अंगद खंदारे, तानाजी व्हावळे, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड, प्राध्यापक एस एल देशमुख, प्राध्यापक दयानंद कुरुडे प्राध्यापक फुलारी, पत्रकार संभाजी मुंडे, धनंजय आरबुने, भगवान साकसमुद्रे, मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, विठ्ठल राव झिलमेवाड, विकास वाघमारे, विद्याधर शिरसाठ, डाबीचे सरपंच संदिपान मुंडे, माणिक मुंडे यांची विशेष उपस्थिती होती. महिला वर्ग प्रचंड संख्येने सिनेमा पाहण्यास उपस्थित होत्या.
या शो साठी बीड पोलीस आणि कार्यकारी निर्माता म्हणून प्रा कुरुडे दयानंद प्रा देशमुख शिवाजीराव ,फुलारी सर डॉ तिंबे आनंद यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला.