21.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

महर्षी दयानंद वेदप्रतिपादित मानवतेचे उद्गाते !

महर्षी दयानंद वेदप्रतिपादित मानवतेचे उद्गाते !

त्रिदिवसीय जन्मशताब्दी सोहळ्यात प्रा. सोनेराव आचार्य यांचे विचार..

परळी वैजनाथ: अमोल सुर्यवंशी

विशुद्ध वैदिक ज्ञानाच्या माध्यमाने धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रात पसरलेला अंधश्रद्धेचा काळोख संपवून महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना केली. म्हणून ते खऱ्या अर्थाने मानवतेचे उद्गाते ठरतात, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय वैदिक विद्वान प्रा.सोनेराव आचार्य यांनी केले. महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा व आर्य समाजाच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.२)पासून येथील नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात त्रिदिवसीय दयानंद द्विशताब्दी सोहळ्यास सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात ते प्रमुख व्याख्याते बोलत होते . अध्यक्षस्थानी क्रांती आर्य सभेचे उपप्रधान श्री लखनमसी वेलानी  हे होते .

या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी वेद पारायण यज्ञाने झाली. यज्ञाचे ब्रह्मापद आचार्य सत्येंद्र यांनी भूषविले.  या यज्ञात यजमान मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . सभेचे अध्यक्ष श्री योगमुनी जी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांनी ओ३म् ध्वजाचे महत्व विशद करून ईश्वराचे मुख्य नाव ओ३म् हे निर्विवाद व निष्पक्ष असल्याचे सांगितले.

दयानंद विचार सत्रात सर्वश्री लक्ष्मणराव हुलगुंडे गुरुजी, पं. राजवीर शास्त्री, श्री लक्ष्मण वेलानी यांनी विचार मांडले तर यांनी केले. दुपारच्या सत्रात अध्यक्षस्थानी श्री शंकरराव बिराजदार हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून मुंबईचे समाज संघटनेचे मंत्री श्री महेश जी वेलानी हे होते. त्यांनी आर्य समाजास युवकांना जोडण्याचे आवाहन केले. सर्वश्री नारायण कुलकर्णी, आचार्य सत्येंद्रजी, अर्जुनराव सोमवंशी, अनिल आर्य आदींनी विचार मांडले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन व्यंकटेश हालिंगे यांनी केले. त्यानंतर सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शारीरिक व्यायाम, योगासने व कसरतीचे प्रदर्शन केले. या राज्यस्तरीय कार्यक्रमात राज्यातून असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. कार्यकर्ते उपस्थित सहभागी झाले आहेत

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या