-5.4 C
New York
Sunday, December 22, 2024

Buy now

महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर राज्य शासन, व्हॉईस ऑफ मीडियाचा उपक्रम

महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
राज्य शासन, व्हॉईस ऑफ मीडियाचा उपक्रम

विजयकुमार यादव, डॉ. प्रदीप महाजन, धर्मवीर भारती, राणा सूर्यवंशी, राहुल पापळ यांचा ‘महाराष्ट्र भूषण’मध्ये समावेश

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत, पत्रकार हितासाठी आग्रही असणाऱ्या पाच व्यक्तींना महाराष्ट्र राज्य सरकार, व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येत आहेत. समाजसेवा, पत्रकारितेसाठी काम करणाऱ्या व्यक्तींबाबत राज्यातून नागरिक, पत्रकारांकडून ३५२ प्रस्ताव आले होते. ज्यातून पाच व्यक्तींची निवड करण्यात आली, अशी माहिती व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, कार्याध्यक्ष तथा मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर यांनी आज दिली.
ज्येष्ठ समाजसेवक पोपटराव पवार, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, इतिहास तज्ज्ञ डॉ. शिवरत्न शेटे, सामाजिक कार्यकर्त्या राजश्री पाटील हे पाच जण निवड समितीमध्ये होते.
विजयकुमार यादव प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक. धर्मवीर भारती प्रसिद्ध अभियंता, सामाजिक कार्यकर्ते. डॉ. प्रदीप महाजन विचारवंत, आरोग्य तज्ज्ञ. राहुल पापळ उद्योजक. राणा सूर्यवंशी उद्योजक, नवनिर्मितीकार यांचा ‘महाराष्ट्र भूषण’मध्ये समावेश आहे.
लातूरचे असलेले विजयकुमार यादव यांनी देशभरामध्ये बावन्न हजार व्यक्तींच्या व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यात अनेक पत्रकारांचाही समावेश आहे.
पुण्याचे असणारे धर्मवीर भारती यांनी गरिबांच्या सहा हजार मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. राज्यभरामध्ये पत्रकारांच्या होत असलेल्या घरांच्या निर्मितीसाठी अभियंता म्हणून भारती यांचे मोठे योगदान आहे.
मुंबईचे असणारे डॉ. प्रदीप महाजन यांचे आरोग्य क्षेत्रामध्ये जगभरात योगदान आहे. ज्या सेवाभावी वृत्तीमध्ये महाजन यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवले, त्यात शेकडो पत्रकारांचाही समावेश आहे.
राहुल पापळ यांनी उद्योगासाठी देशभरामध्ये मोठे योगदान दिले आहे. आता त्यांची वाटचाल आंतरराष्ट्रीय दिशेने सुरू आहे. त्यांच्या लाडाची कुल्फी हा ब्रँड उद्योगाच्या रूपाने हजारो तरुणांचे जगण्याचे साधन बनले आहे. अर्धवेळ काम करणाऱ्या कित्येक पत्रकारांना राहुल यांनी उद्योगाच्या वाटेने चालण्यासाठी मदत आणि योगदानही दिले आहे.
राणा सूर्यवंशी यांनी अनेक राज्यांमध्ये बेरोजगारीवर मात करण्यासाठी अनेक प्रोजेक्ट उभे केले. गोवा, महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अनेक प्रोजेक्टने नवनिर्मितीचा इतिहास केला आहे. अर्धवेळ काम करणाऱ्या पत्रकारांनाही या प्रोजेक्टच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळाली आहे.
या पुरस्काराच्या निमिताने बोलताना मंगल प्रभात लोढा (मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता) म्हणाले की,
महाराष्ट्र राज्यासाठी योगदान देणाऱ्या या पाचही लोकांचा राज्य शासनाला मनापासून अभिमान वाटतो. नवनिर्मितीसाठी ज्यांचे हात लागतात तिथे इतिहास बनतो. या पाचही जणांनी केलेले काम इतिहासाच्या सोनेरी पानावर लिहिले जाईल. या उपक्रमाच्या निमित्ताने या पाचही जणांची महाराष्ट्राला ओळख होणार आहे. उद्योग, समाजसेवेमध्ये योगदान देऊ पाहणाऱ्या त्या प्रत्येक तरुणांसाठी ही पाच मंडळी आदर्श ठरणार आहेत. हा पुरस्कार म्हणजे शाबासकीची थाप आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी या पुरस्कार उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात नव्या पिढीला, पत्रकारितेला काम करण्यासाठी बळ मिळेल, असे सांगितले.
मुख्य संयोजक आणि राज्य कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर म्हणाले, या पुरस्काराच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अनेक जण महाराष्ट्रासाठी किती उपयोगाचे आहेत, त्यांचे किती मोठे योगदान आहे, हे समाजासमोर येईल. व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रमुख विश्वस्त अजितदादा कुंकूलोळ, विजय चोरडिया, अरुण ठोंबरे, दिगंबर महाले, मंगेश खाटीक, संजय पडोळे, चेतन कात्रे, अमर चौंदे, राज्य कोषाध्यक्ष गजानन देशमुख यांनी या पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे, असे सांगितले. हा सोहळा मुंबईमध्ये आयोजित केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या