कपिल मस्के ला मारून टाकण्याचा नगराध्यक्ष व जनविकासचा डाव: मीना मस्के
मागण्या रास्त असताना उपोषण सोडवण्यास टोलवाटोलवी.
केज प्रतिनीधी : केज नगरपंचायत हद्दीत वार्ड क्रमांक 7,8,9 येथील जनभुत मुद्दे घेऊन केज नगरपंचायत चे माझी नगरसेवक कपिल मस्के हे फुलेनगर भागात उपोषण गेल्या 6 दिवसांपासून करत आहेत.या मध्ये प्रामुख्याने मागणी म्हणजे आण्णाभाऊ साठे मागासवर्गीय योजनेंतर्गत 3 कोटी 50 लाखाचा निधी हा दलित वस्ती साठी आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्नातून मिळाला आहे.तो निधी नगरपंचायत कडे हस्तांतरीत झाल्या नंतर नगरपंचायत तो रस्ता दलित वस्तीत न करता जनविकास चे सर्वेसर्वा असे बिरुदावली लावलेले पण स्वतः व आपल्या चेले चपट्या च्या माध्यमातून प्लांटीग व्यावसायिक असलेले हारून इनामदार यांनी तो रस्ता निर्मनुष्य असलेल्या वस्तीत घेऊन गेले व रस्ता करण्यास सुरुवात केली आहे.एक दलित नगराध्यक्ष असताना या दलिताचे कैवारी समजणारे नगराध्यक्ष व हारून इनामदार यांनी सरळ सरळ दलितांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे.त्या दलितांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाना साठी कपिल मस्के उपोषण गेल्या सात दिवसांपासून करत आहेत पण ज्या वार्ड क्रमांक सात मधून कपिल मस्के यांचा पराभव करून नगराध्यक्ष निवडून आल्या व नगराध्यक्ष बनल्या आहेत आज त्यांचा उपोषणा कडे दुर्लक्ष करत आहेत.कारण कपिल मस्के यांनी त्यांच्या नगराध्यक्ष निवडीवर वर व हारून इनामदार यांच्या स्विक्रत सदस्याच्या निवडीवर आक्षेप घेत जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल केली असून सुनावणी अंतिम टप्प्यात आहे.त्या विरोधातील सर्वे पुरावे कपिल मस्के यांच्या कडे असल्यामुळेच यांचे धाबे दणाणले आहे त्याच मुळे माझे पती कपिल मस्के यांना त्यांच्या मागणीवर कुठलीही कारवाई न करता त्याना उपोषण सोडढ्यास प्ररावरतीत न करता त्यांना मारण्याचा डाव आखल्याचे कपिल मस्के यांच्या पत्नी मा.ग्रामपंचायत सदस्य मीना कपिल मस्के यांनी काल केज तहसीलदार यांना महिला शिष्टमंडळा सह भेटून आरोप केले आहेत माझ्या पतीस कांही झाले तर त्याचे सर्वस्वी जिम्मेदार हारून इनामदार व नगराध्यक्ष असतील असे सांगण्यात आले.यात या विभागातील असंख्य महिला त्यांच्या सोबत होत्या.









