शिव फाउंडेशनच्या वतीने प्राण्यांसाठी पाणवठ्यामध्ये सोडले पाणी.
विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर :-येथील वनक्षेत्रातील पाणवठ्यामध्ये मदनवाडी (ता. इंदापूर )येथील शिव फाउंडेशनच्या वतीने हरिण,ससे,कोल्हे, लांडगे आदी वन्य प्राण्यांसाठी पाणी सोडण्यात आले. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.
यावेळी वन्य प्राण्यांना अनेकदा रस्त्यावर अपघाताला सामोरे जावे लागत होते. पाणवठ्यांमध्ये पाणी सोडल्यामुळे वन क्षेत्रातील प्राण्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत बोलताना शिव फाउंडेशनचे अध्यक्ष संपत बंडगर म्हणाले, सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्यामुळे येथील प्राण्यांची पाण्यासाठी वणवण सुरू होती. ही बाब विचारात घेऊन शिव फाउंडेशनच्या वतीने अकोले, पोंधवडी व भादलवाडी येथील कृत्रिम पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. उन्हाळ्यामध्ये गरजेनुसार हे कृत्रिम पाणवठे भरून प्राण्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.
कार्यक्रमाचे संयोजन शिव फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले.यावेळी बिल्ट कंपनीचे व्यवस्थापक धरणेंद्र गांधी , शिव फाउंडेशनचे अध्यक्ष संपत बंडगर, वनपाल अजय घावटे, वनरक्षक सनी कांबळे, किरण रायसोनी, कामगार आघाडीचे दिनेश मारणे,जैन संघाचे संतोष अब्बड, आकाश वनवे, काशिनाथ दराडे उपस्थित होते.