वीज दरवाढी बाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंबाजोगाईच्या वतीने तहसील कार्यालयास दिले निवेदन
वीज दरवाढी बाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंबाजोगाईच्या वतीने तहसील कार्यालयास दिले निवेदन
अंबाजोगाई : प्रतिनिधी
महाराष्ट्र वीज वितरणने लादलेल्या वीज दरवाढीचा केज तालुका शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला..!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे, शिवसेना संपर्कनेते सुनील प्रभू , शिवसेना उपनेत्या प्रा.सुषमाताई अंधारे, शिवसेना मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरूरकर,बीड जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार ,बीड लोकसभा प्रमुख सुनील दादा धांडे, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ,शिवसेना जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या सुचनेनुसार,केज शिवसेना तालुकाप्रमुख बालासाहेब यांच्या नेतृत्वाखाली,आज अंबाजोगाई तहसीलदार यांना सरकारने वीज बील दरवाढीचा घेतलेल्या निर्णयाविरोधात अंबाजोगाई तालुका शिवसेनेकडून निवेदन देण्यात आले,
यात वीज दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका बसणार आहे, त्यामुळे येत्या काळात हा विज दरवाढीचा निर्णय सरकारने स्थगित करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख बालासाहेब शेप प्रिन्स,शिवसेना शहर प्रमुख अशोक हेडे,महिला तालुकाप्रमुख रेखाताई घोबाळे, विधानसभा महिला संघटिका नयनाताई शिरसाट, विधानसभा प्रमुख युवराज चव्हाण, विधानसभा संघटक अर्जुन जाधव,तालुका प्रमुख बालाजी चाटे तालुका उपप्रमुख निखिल पाडोळे. तालुका सचिव बाबा भिसे, उपशहर प्रमुख पप्पू आपेट, विधानसभा सचिव दुलेखा पठाण,श्रीकांत कदम,सह शिवसैनिक उपस्थित होते