26.2 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

जागृती नागरी सहकारी पतसंस्थेची आर्थिक उलाढाल ४०३ कोटी तर पतसंस्थेस ४० लाख ९८ हजारांचा नफा : प्रा. गंगाधर शेळके

*जागृती नागरी सहकारी पतसंस्थेची आर्थिक उलाढाल ४०३ कोटी तर पतसंस्थेस ४० लाख ९८ हजारांचा नफा : प्रा. गंगाधर शेळके*

परळी (प्रतिनिधी)…
बीड जिल्ह्याच्या सहकार तथा अर्थिक क्षेत्रामध्ये नावलौकिक असणाऱ्या जागृती नागरी सहकारी पतसंस्थेची आर्थिक उलाढाल ४०३ कोटी ८४ लक्ष रुपये इतकी झाली असून सरत्या आर्थिक वर्षात पतसंस्थेला ३१ मार्च २०२४ अखेर ४० लाख ९८ हजार रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक प्रा. गंगाधर शेळके सर यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या परळी वैजनाथ येथील मुख्य शाखेसह अंबाजोगाई व सिरसाळा अशा एकूण तीन शाखा कार्यरत असून जागृती ग्रुप नेहमीच मराठवाड्याच्या आर्थिक व सहकार क्षेत्रात अग्रेसर राहिला आहे. पतसंस्थेच्या परळी, अंबाजोगाई, सिरसाळा येथील शाखांची आर्थिक उलाढाल ४०३ कोटी ८४ लाख असून पतसंस्थेला ३१ मार्च २०२४ अखेर ४० लाख ९८ हजार रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती प्रा. गंगाधर शेळके सर यांनी दिली आहे. जागृती पतसंस्थेचा आर्थिक व्यवहारासह सामाजिक कार्यातही मोठा वाटा असून पतसंस्थेच्या वतीने ग्राहक, सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांच्यासह समाजातील विविध स्तरातील नागरिकांसाठी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. ग्राहकांचा विश्वास तसेच संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार, कर्मचाऱ्यांची व पिग्मी एजेंटस यांची विनम्र सेवा, संस्थेच्या कामकाजातील प्रशासकीय सुसूत्रता आदी बाबीमुळे सर्वांचा विश्वास संपादन करत प्रा. शेळके सर यांच्या नेतृत्वाखाली जागृती नागरी सहकारी पतसंस्था सदैव प्रगतीपथावर असून गत १२ वर्षापासून पतसंस्थेला ऑडिट वर्ग अ दर्जा प्राप्त झालेला आहे.

संस्थेच्या परळी वैजनाथ येथील मुख्य शाखेत ग्राहकांसाठी लॉकर ची सुविधा उपलब्ध असून ग्राहकांच्या सेवेसाठी वीज बिल भरणा केंद्र ही कार्यान्वित आहे. ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळावी या उद्देशाने संस्थेच्या तिन्ही शाखा संगणकीकरणाने एकमेकांशी जोडलेल्या आहेत.३१ मार्च २०२४ अखेर संस्थेचे भाग भांडवल ५९ लाख ९ हजार, ठेवी ६७ कोटी ८० लाख, कर्ज २५ कोटी १८ लाख, गुंतवणूक ४३ कोटी ४० लाख तर सरत्या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेला ४० लाख ९८ इतका नफा झाल्याची माहिती प्रा. शेळके सर यांनी दिली. पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. प्रा. शोभा शेळके, सचिव वसंतराव सूर्यवंशी, कोषाध्यक्ष संतोष चव्हाण संचालक मंडळ सर्वश्री दत्तात्रय सोळंके, प्रा. अशोकराव देशमुख, शेख गफार शेख अफसर, मारुती बोबडे, मकरंद वाघमारे, चंद्रकांत टाक, श्रीमती चंद्रकला मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याने हे यश प्राप्त झाल्याचे प्रा. शेळके सर यांनी सांगितले आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या