महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत पंकजाताई मुंडेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज
महामानवांना अभिवादन करत रॅलीची सुरवात
बीड । लोकसभा विशेष बातमीपत्र
महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांची काल बीड शहरात अभूतपूर्व अशी रॅली निघाली. रॅलीपूर्वी दुपारी २.१५ वा च्या सुमारास पंकजाताई मुंडे यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांसह जिल्हा निवडणूक निर्णय अधिका-यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे,खा. डॉ.प्रीतमताई मुंडे, गौरव खाडे, यशःश्री मुंडे, पंकजाताईंचे चिरंजीव आर्यमान पालवे, मनसे नेते व मामा प्रकाश महाजन, आ.प्रकाश सोळंके, आ. सुरेश धस, आ.बाळासाहेब आजबे,आ. नमिता मुंदडा, माजी आ.अमरसिंह पंडित, भीमराव धोंडे, आर.टी. देशमुख, केशवराव आंधळे, संजय दौंड, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, कल्याण आखाडे, पी. टी. चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, रमेश आडसकर, मोहन जगताप, वाल्मिक निकाळजे, सलीम जहांगीर, अण्णासाहेब मातकर, राजेंद्र मोटे, सुमंत धस, अनिल तुरूकमारे आदींसह महायुतीचे नेते यावेळी उपस्थित होते.
🔶अभूतपूर्व रॅली
अर्ज दाखल केल्यानंतर पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ शहरात महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने अभूतपूर्व रॅली काढण्यात आली. शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत पंकजाताई मुंडेंनी या रॅलीत उपस्थितांचे सत्कार ,आशीर्वाद घेतले. ही रॅली माळीवेस, सुभाष रोड मार्गे आल्यानंतर रस्त्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांना पंकजाताईंनी अभिवादन केले. रॅलीत जिल्हाभरातून महायुतीचे कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाल्याचे पहायला मिळाले. ओपन वाहनातून निघालेल्या या रॅलीत पंकजाताईंनी हात उंचावून अभिवादन करत नागरिकांचे स्वागत स्विकारले. ठिकठिकाणी फुलांच्या वर्षावात त्यांचे स्वागत झाले. रॅली मार्गावर ‘पंकजाताई मुंडे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, कोण आली रे आली, महाराष्ट्राची वाघिण आली, अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला होता.
🔶घोषणाबाजीने परिसर दणाणला
भारतीय जनता पक्ष आणि पंकजाताई मुंडे यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजीने भाजप, शिवसेनेसह, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे ध्वज उंचावून कार्यकर्ते नृत्यात तल्लीन झाले होते. तापमानात प्रचंड वाढ होती तरीही कार्यकर्ते उत्साहात सहभागी होते.
🔶महायुतीच्या नेत्यांसह पुणे जिल्ह्यातील चार आमदारांची उपस्थिती
पंकजाताई मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना बीड जिल्ह्यातील भाजप महायुतीच्या सर्व नेत्यांची उपस्थितीसह पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, सरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी उपस्थित राहून रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पंकजाताईंचा अर्ज दाखल करताना पुण्यातील महायुतीचे आ. सुनील शेळके, आ. माधुरी मिसाळ, आ. आश्विनी जगताप, आ. उमाताई खापरे हे चार आमदार उपस्थित राहिले.